• Sat. Sep 21st, 2024
महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; मात्र अद्याप कामावर गैरहजर, महसूलमंत्र्यांचा कडक इशारा

अहमदनगर: काही दिवसांपूर्वी महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. परंतु अनेक अधिकारी बदली झालेल्या ठिकाणी हजर झालेले नाही. अशी मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता अडचण होणार असून बदली झालेल्‍या ठिकाणी हजर न होणा-या महसूल विभागातील आधिका-यांवर आता कारवाई करुन, त्‍यांची सेवा खंडीत करण्‍याचा कडक इशारा महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिला आहे. ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.
अधिकाऱ्याच्या लेकाकडून विठ्ठलाची पूजा, वारकरी आक्रमक होताच दिलगिरी, व्हिडिओ व्हायरल कसा झाला, नेमकं काय घडतंय?
माध्‍यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, महसूल विभागातील बदल्‍यांची प्रक्रिया केव्‍हाच संपली आहे. त्‍यामुळे बदली झालेल्‍या ठिकाणी अनेक अधिकारी अद्याप हजर होत नसल्‍याच्‍या तक्रारी प्राप्‍त होत आहेत. याची गंभीर दखल आता महसुल विभागाने घेतली असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन, त्‍यांनी सांगितले की, विदर्भ, मराठवाड्यातील ७० टक्‍के जागा यापुर्वी रिक्‍त होत्‍या. त्‍या सर्व जागांवर आता अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत.

भिडेंची वक्तव्य हा वयोमानाचा परिणाम, दीपक केसरकरांचा टोला

परंतू काही ठिकाणी अधिकारी हजर होत नसल्याने अशा अधिका-यांना आता निलंबनाच्‍या नोटीसा देण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यांच्‍या विभागीय चौकशी आणि सेवा खंडीत करण्‍याचा निर्णयही वेळप्रसंगी विभागाला घ्‍यावा लागेल, असा इशारा विखे पाटलांनी दिला. महसूल मंत्र्यांच्या या कडक भूमिकेनंतर आता बदली झालेले अधिकारी बदली झालेल्या ठिकाणी हजर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed