• Thu. Jul 30th, 2026
    संभाजी भिडेंच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक; शिवप्रतिष्ठानच्या सदस्यांनी सांगलीत कुणाला दिला इशारा

    सांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या महात्मा गांधीजींच्या विरोधातील वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात त्याचे संतप्त पडसाद उमटले. या वक्तव्याचा विरोधात सर्वत्र आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीत मात्र शिवप्रतिष्ठानच्या धारकाऱ्यांनी भिडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून त्यांचे समर्थन केले आहे.
    Sambhaji Bhide: बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंना अखेर दणका; अमरावतीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
    भिडेंनी स्वतःच्या तोंडून सदरचे वक्तव्य केले नसल्याचा दावा करत इथून पुढे भिडेंना आडवे येणाऱ्याला आडवे करू. तसेच सांगलीतील उद्या होणारे काँग्रेसचे आंदोलन उधळून लावण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. सांगलीतील मारुती चौक येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आज दुपारच्या सुमारास शिवप्रतिष्ठानचे धारकरी संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. प्रेरणा मंत्र म्हणून संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला.

    हा माणूस बाहेर कसा फिरू शकतो? पृथ्वीराज चव्हाण संतापले; संभाजी भिडेंवर कारवाईची मागणी

    संभाजी भिडे यांच्या विरोधातील आंदोलन खपवून घेतले जाणार नाही. उद्या सांगलीत होणारे काँग्रेसचे आंदोलन उधळून लावण्याचा शिवप्रतिष्ठानचा इशारा देत इथून पुढे संभाजी भिडे यांना कोणी आडवा जाईल त्याला आपण आडवा करणार, असेही सांगण्यात आले. संभाजी भिडे यांच्या तोंडातून ते वाक्य आले नाही. काँग्रेसच्या नेत्याने लिहिलेल्या पुस्तकातील वाक्य धारकाऱ्याने वाचून दाखवले असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. या दुग्धाभिषेकवेळी शिवप्रतिष्ठानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Nagpur News: पूरग्रस्त घरांच्या संख्येवरून वाद -प्रतिवाद;महापालिकेचा हजार घरांचा अंदाज,तर पाच हजार घरे बाधित झाल्याचा नगरसेवकांचा दावा
    Satara Koyna Dam : ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’! साताऱ्यातील धरणाच्या जलाशयाला मिळाली नवी ओळख; सरकारचा मोठा निर्णय
    Sangli Crime : महावितरणच्या सबस्टेशनमध्ये दुचाकी चार्जिंग करण्यास विरोध, वॉचमनच्या मुलाच्या डोक्यात सणक गेली; ऑनड्युटी ऑपरेटरला संपवलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed