• Mon. Nov 25th, 2024

    डोंबिवलीत खड्ड्यांचे साम्राज्य! आमदार राजू पाटीलांची तीव्र शब्दात टीका, म्हणाले- कामात ४० टक्के लाच…

    डोंबिवलीत खड्ड्यांचे साम्राज्य! आमदार राजू पाटीलांची तीव्र शब्दात टीका, म्हणाले- कामात ४० टक्के लाच…

    ठाणे: खड्डे भरण्याच्या कामात ४० टक्के लाच घेतली जाते. ठाण्याचे आयुक्त चांगलं काम करत आहेत. मात्र इथल्या अधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडलं आहे. पालिका ऑटो मोडवर सुरू असल्याची टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली. कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांचा बळी गेला आहे. खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा महापालिकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
    संभाजी भिडेंच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक; शिवप्रतिष्ठानच्या सदस्यांनी सांगलीत कुणाला दिला इशारा
    याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी ही शरमेची बाब आहे. दरवर्षी खड्डे भरण्यासाठी टेंडर काढले जातात. ४० टक्के रस्त्याच्या कामात लाच घेतली जाते. त्यामुळे ठेकेदारावर नियंत्रण नाही. कामात दर्जा नाही. कोणतेही अद्यावत यंत्रणा पालिकेकडे नाही. इच्छा शक्तीचा भाग आहे. ठाण्याचे आयुक्त चांगले आहेत. नवी मुंबईत देखील त्यांनी चांगलं काम केलं कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडून दिले आहे. महापालिका ऑटो मोडवर चालली आहे. कुणाचा कुणाला मागमूस नाही, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.

    बोलायला उभे राहिले, घोषणाबाजी थांबेना; Aaditya Thackeray म्हणाले, मला भिती वाटते

    निवडणुकीच्या तोंडावर मोठागाव, माणकोली पूल खुला करतील. मात्र पुलाला एक्सेस रस्ते तयार नसल्याने डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्याची टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली. मनसे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवली मानकोली पुलाची माणकोली बाजूने पाहणी केली. यावेळी त्यांनी माणकोली पूल तयार झाला तरी पुलाला येण्या जाण्याचे डोंबिवली मोठागाव तसेच माणकोलीचे रस्ते अजून तयार नाही. यांचे नियोजन नाही. हे रस्ते आधीच तयार करणे गरजेचे होते. निवडणुकीच्या तोंडापर्यंत हे काम खेचायचे असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed