जळगाव : जळगाव तालुक्यातील रायपूर कंडारी गावात परप्रांतीय तरूणाने मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. गोविंदकुमार बलराम पासवान (वय-३२) रा. दरबंगा, बिहार ह.मु. रायपूर कंडारी ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या परप्रांतिय तरूणाचं नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोविंदकुमार पासवान हा तरूण आपला मामा अर्जून कुमार यांच्यासोबत गेल्या सहा महिन्यांपासून जळगाव तालुक्यातील रायपुर कंडारी इथे मोहन परदेशी यांच्या घरात भाड्याच्या खोलीत वास्तव्याला होता. गोविंदकुमार पासवान हा एमआयडीसीतील इंडो ऑईल प्रोटीन फूड या खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरीला होता. सोबत राहणारे मामा अर्जून कुमार यांची रात्रपाळी असल्याने ते शनिवारी रात्री १० वाजता कंपनीत कामाला निघून आले. त्यानंतर गोविंदकुमार हा घरी एकटाच होता.
दरवाजा तोडून मृतदेह खाली उतरविला..

मध्यरात्री गोविंदकुमार याने छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी ८ मामा अर्जूनकुमार हे घरी आले तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले तर गोविंदकुमार याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर शेजारी राहणारे ग्रामस्थ व इतरांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि गोविंदकुमार याचा मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. गोविंदकुमार याच्या आत्महत्या करण्यामागचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.