• Mon. Nov 25th, 2024

    वाढदिवशी सुट्टीऐवजी कर्तव्याला प्राधान्य, अग्निशमन दलाच्या जवानामुळे पुण्यातील अनर्थ टळला

    वाढदिवशी सुट्टीऐवजी कर्तव्याला प्राधान्य, अग्निशमन दलाच्या जवानामुळे पुण्यातील अनर्थ टळला

    पुणे : वाढदिवशी ड्युटीवर निघालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याला कुटुंबीयांनी सुट्टी घेण्याचा आग्रह धरला. मात्र कोंढव्यात लागलेल्या आगीचं वृत्त समजलेल्या पुणे अग्निशमन दलाच्या धाडसी जवानाने कर्तव्य आधी, वाढदिवस नंतर, असं म्हणत तत्परता दाखवली. दशरथ माळवदकर यांच्यासह फायर ब्रिगेडच्या जवानांच्या साहसामुळे मोठा अनर्थ टळला.

    आज पहाटे पुण्यातील कोंढवा, कौसर बाग येथे आगीची घटना घडली होती. अग्निशमन दलाकडून कोंढवा बुद्रुक व कोंढवा खुर्द येथील फायर ब्रिगेडच्या गाड्या प्रथम रवाना करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी एक छोटे गोडाऊन व गॅरेज होते. आगीचे मोठे स्वरुप पाहता अतिरिक्त अग्निशमन वाहनेही दाखल झाली होती. दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे आग इतरत्र न पसरता धोका टळला व आग पूर्णपणे विझली. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.

    लहान बहिणीचं मोठं मन, कोट्यवधींची संपत्तीही पडेल फिकी; भावासाठी आयुष्यभर पुरणारं दान
    दरम्यान, कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रातील जवान दशरथ माळवदकर यांचा आज ५४ वा वाढदिवस आहे. ते अग्निशमन दलात गेली २२ वर्षे सेवा बजावत आहेत. ते आज सकाळ पाळीला जाताना कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण केले आणि ड्युटीवर जाताना सुट्टी घेण्याचा आग्रह धरला. परंतु त्यांनी “कर्तव्य आधी, वाढदिवस नंतर” असे म्हणत ड्युटीवर जाणं पसंत केलं.

    पुण्यात अग्नीतांडव; मार्केटयार्डमधील हॉटेलमध्ये आग, पोटमाळ्यावर झोपलेल्या २ कामगारांचा

    माळवदकर घराबाहेर पडले. कारण त्यांना कोंढवा येथील आगीची घटना कळली होती. आपण सुट्टी न घेता आगीच्या वर्दीवर जाणे हे गरजेचे समजून तत्परतेने ड्युटीवर जाऊन त्यांनी आपले कर्तव्य बजावले.

    प्रियजनांच्या जीवापेक्षा धर्म मोठा नाही, भिन्नधर्मीय महिलांचे एकमेकींच्या कुटुंबीयांना किडनीदान
    घटनास्थळी असलेले अग्निशमन अधिकारी समीर शेख, पंकज जगताप, सुनिल नाईकनवरे, कैलास शिंदे व इतर जवानांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या कामाचे कौतुक केले. अग्निशमन दलाचे जवान नेहमीच आपल्या कर्तव्याला महत्त्व देत कामगिरी चोख बजावतात, हे या निमित्ताने अधोरेखित झाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed