• Sat. Sep 21st, 2024
ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना पुढचा टायर फुटला, एसटीवरील चालकाचं नियंत्रण सुटलं, अन् …

जळगाव : ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कापलेल्या झाडाच्या वरून चाक गेल्याने टायर फुटल्याने बसचां अपघात झाल्याची घटना शुक्रवारी मुक्ताईनगर तालुक्यात पारंबी फाट्याजवळ घडली. जळगाव ते काटेलधाम या बसला अपघात झाला असून यात नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कुऱ्हा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. बसच्या मागे किंवा पुढे कुठलेही वाहन नसल्याने सुदैवाने अपघातात प्राणहानी टळली आहे.

मुक्ताईनगर आगाराची एमएच २० बीएल-१७७० या क्रमांकाची बस आज काटेलधाम येथून निघून जळगावकडे येत होती. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा-काकोडा गावाजवळ असलेल्या पारंबी फाट्याजवळ समोर चालत असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न बस रस्ता लागत कापलेला झाडाच्या बुंध्यावरून गेले त्यामुळे बसचे पुढचे टायर अचानक फुटले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस ही बाजूलाच असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन धडकली.
संजू सॅमसनचीच जर्सी घालून सूर्या मैदानात का उतरला होता, खरं कारण ऐकाल तर हैराण व्हाल…
या अपघातामध्ये नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यात प्रतीक्षा सुनील झांबरे ( २२, रा. आळंद ); समाधान उखर्डु तायडे ( ६९, रा. मानेगाव ); कमल गोविंदा पवार ( ५९, रा. वढोदा ); जानकोर त्र्यंबक महाले ( ७५, रा. वढोदा); नलीनी भास्कर न्हावी ( ७०, रा. वढोदा); अनुराधा पाटील ( ३५, मेळसांगवे); कस्तुराबाई भोलणकर ( ७०, रा. शिरसोली); सपना विनोद पाटील ( २७, रा. जामनेर); सार्थक विनोद पाटील (२, रा. जामनेर) यांचा समावेश आहे.

प्रोजेक्ट मॅनेजरची नोकरी,ऑस्ट्रेलियन डॉलर्समध्ये पगाराची ऑफर देत डाव साधला, तब्बल ७ लाखांची फसवणूक, काय घडलं?

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील गावामधील तसेच शेतातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली. यात कुर्‍हा येथील शिवसेनेचे शहरप्रमुख पंकज पांडव यांनी तात्काळ अपघातग्रस्तांना स्वत: रूग्णवाहिकेत टाकून स्वत: रुग्णवाहिका चालवत उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. या रूग्णांवर मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत.

Sushma Andhare: शरद पोंक्षे म्हणाले ‘आरक्षण’ नसताना करुन दाखवलं! सुषमा अंधारेंचं सडेतोड प्रत्युत्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed