• Sat. Sep 21st, 2024

अनाथ मुलींचे बालविवाह रोखण्यासाठी समुपदेशन सेवा, सुरक्षितता मिळावी; नीलम गोऱ्हेंची मागणी

अनाथ मुलींचे बालविवाह रोखण्यासाठी समुपदेशन सेवा, सुरक्षितता मिळावी; नीलम गोऱ्हेंची मागणी

मुंबई: बालसंगोपन योजना राज्यातील मुलांपर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे. परंतु इथे असणाऱ्या मुलींचे वय १२ वर्षा पेक्षा वाढले की,मुलीचे आई – वडील लग्न उरकण्याची घाई करतात. विशेषत: अनाथ मुलींचे लग्न अल्प वयात लावण्याची समाजाची प्रवृत्ती आहे. त्यामुळे या मुलींना समुपदेशन, सुरक्षितता मिळते आहे की नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

या विषयाबाबत मंत्री श्रीमती. अदिती तटकरे यांनी मा. उपसभापती यांनी केलेल्या सुचनेच्या दृष्टीने महिला व बालविकास विभागाकडून येथील मुलींसाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. आज विधानभवनात प्रश्नोत्तराच्या तासात परिषद सदस्य श्री. रमेश कराड यांनी राज्यात कोरोना कालावधीत अनाथ झालेल्या मुलांसाठी बालसंगोपन योजनेअंतर्गत बाल न्याय निधीचे वाटप करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंकडून अदिती तटकरेंचे कौतुक

सन्माननीय मंत्रीमहोदयांनी अतिशय चांगले उत्तर दिलेले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये महिला बाल विकास विभागाचे अधिकारी चांगलं काम करत आहेत. विशेषतः सांगली जिल्ह्यात अधिकारी प्रत्येक निराधार व कुटुंबापर्यत पोहोचलेल्या आहेत. असं म्हणत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंत्री महिला व बालकल्याण श्रीमती. अदिती तटकरे व विभागाचे कौतुक केले.

आम्ही रात्री ९-१० पर्यंत कामकाज करायचो, तुम्ही ६ वाजताच घड्याळ बघता? ही काय पद्धत; नीलम गोऱ्हे भडकल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed