• Sat. Sep 21st, 2024
चंद्रपुरात पावसाचे थैमान! सात दिवसात दुसऱ्यांदा पुराचा फटका; ३०० लोकांचे स्थलांतर

चंद्रपूर: हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला बुधवारी आरेंज तर गुरुवारी रेड अलर्ट जारी केला होता. गुरुवारच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यात इरई धरणाचे दोन दरवाजेही उघडण्यात आले आहेत. यामुळे चंद्रपूर शहरातील सकल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरात पाणी शिरले. अनेकांनी घराच्या छतावर आश्रय घेतला. आतापर्यंत जवळपास तीनशे लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. येत्या काही तासांत पूरस्थिती बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Weather Forecast : राज्यात पाऊस ओसरणार, आज या भागांना अलर्ट पण उद्यापासून जोर कमी; वाचा वेदर रिपोर्ट
वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने चंद्रपूर शहराजवळील इरई आणि झरपट नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. शहरातील राजनगर, सहारा पार्क आणि सिस्टर कॉलनी परिसरात इरई नदीचे पाणी शिरले आहे. या भागात असलेल्या घरांना ८ ते १० फूट पाण्याचा वेढा आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने पूरग्रस्त भागातून लोकांना काढण्यास सुरुवात केली आहे. इरई धरणातून पाणी सोडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाची लोकांना राजनगर-सहारा पार्क भागातून रेस्क्यू करण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात दुसऱ्यांदा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील सिस्टर कॉलनी, रहमत नगर परिसरातील ३०० नागरिकांना रिस्क्यू करत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

चंद्रपूर-तेलंगणा राज्याला जोडणारे तीन मार्ग पाण्याखाली गेले आहेत. बामणी-राजुरा मार्गांवरील वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली आहे. विरूर-वरुर मार्गही बंद आहे. जिल्हाच्या शेवटचा टोकावर असलेल्या पोडसा हा पूल दोन राज्यांना जोडणारा आहे. सात दिवसात हा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. विशेष म्हणजे हा पूल क्षक्तीग्रस्त होता. मागील उन्हाळ्यात या पुलाची डागडुजी करण्यात आली होती.

तब्बल ४१ वक्र दरवाजे असलेलं महाराष्ट्रातील मोठं धरण, तापी नदीवरील हतनूर धरणाची खासियत

राजुरा -बल्लारपूर ,राजूरा – सास्ती,धानोरा -भोयगाव, गौवरी कॉलनी – पोवणी , तोहोगावं,कोरपना – कोडशी (अधे मध्येे बंद चालू स्थितीत )
रूपापेठ – मांडवा ,(अधे मध्ये बंद चालू स्थितीत ), जांभूळधरा – उमरहिरा ,( अधे मध्ये बंद चालू स्थितीत ), पिपरी – शेरज ,पारडी – रुपापेठ (अधे मध्ये बंद चालू स्थितीत, कोडशी – पिपरी,कोरपना – हातलोणी , (अधे मध्ये बंद चालू स्थितीत कुसळ – कातलाबोडी – कोरपना,शेरज – हेटी (अधे मध्ये बंद चालू), वनसडी – भोयगाव, विरूर स्टेशन -वरूर रोड़, विरूर स्टेशन -सिंधी, विरूर स्टेशन -लाठी, धानोरा-सिंधी हे मार्ग बंद आहेत. पोंभुर्णा-आक्सापूर मार्गांवर बेरडी नाल्यात कार वाहून गेली. एक किलोमीटर अंतरावर कार सापडली पण कारचालक बेपत्ता आहे. कारचालक अमित गेडाम पोंभुर्णा येथील तहसील कार्यालयात पुरवठा सहाय्यक म्हणून कार्यरत होते. गोंडपिपरीच्या शासकीय गोदामचा त्यांच्याकडे प्रभार होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed