• Sat. Sep 21st, 2024

कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी; महापुराचे संकट टळले; जाणून घ्या बालिंगा पूल कधी सुरू होणार

कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी; महापुराचे संकट टळले; जाणून घ्या बालिंगा पूल कधी सुरू होणार

कोल्हापूर: गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली अशातच राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे देखील उघडल्याने मोठ्या प्रमाणात धरणाचे पाणी पंचगंगा नदीमध्ये येत होत. त्यामुळे पंचगंगा आपली धोका पातळी ओलांडेल या अनुषंगाने प्रशासन देखील सतर्क होऊन पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते. तसेच अनेक मार्ग देखील बंद करण्यात आले होते, मात्र सुदैवाने पाऊस थांबल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ न झाल्याने कोल्हापूरवर महापुर येणार धोका हा टळला आहे. कुटुंबीयांना उद्या पुन्हा त्यांच्या घरी सोडण्याचे तसेच बालिंगा पुल देखील सुरू करण्यात येईल. शाळा उद्यापासून पुरवत होतील, असे जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

स्थलांतर केलेल्या सर्व नागरिकांना उद्या पुन्हा त्यांच्या घरी पाठवू

राधानगरी धरणाचे काल पाच स्वयंचलित दरवाजे उघडले यामुळे मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होता. यामुळे आपल्या धोका पातळीकडे वाटचाल करत असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रशासनाने पुराचा फटका बसणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता, तसेच काही कुटुंबांना स्थलांतर देखील केले होते. शाळा देखील अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या होत्या.

राजापूर शहर अलर्ट मोडवर; पुराचे पाणी जवाहर चौकातून बाजारपेठेच्या दिशने, प्रशासनाकडून इशारा
काल पावसाने काही काळ उसंत घेतली, यामुळे राधानगरी धरणाचे पाणी पंचगंगेत आले तरी काही इंच पाणी वाढले. यामुळे कोल्हापूरवर आलेला महापुराचा संकट आता टळले असून यामुळे स्थलांतर केलेल्या सर्व नागरिकांना आज संध्याकाळपर्यंत आढावा घेऊन उद्या पुन्हा त्यांच्या घरी पाठवू असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले. अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेल्या शाळा उद्यापासून पुन्हा सुरू होतील आणि ज्या शाळामधील परीक्षा रद्द झाली त्यांची नवीन तारीख जाहीर करणार, असे ते यावेळी म्हणाले.

ठाण्याला पावसाने झोडून काढले; २४ तासात तिघांचा जीव गेला, मुंब्रा येथे दरड कोसळली, शाळांना उद्या…
एकेरी वाहतूक सुरू करणार

तसेच नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने बालिंगा पुलावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली होती. या पूलावरून होणारी वाहतूक ठप्प झाल्याने सदरचा पूल सुरू करण्याची मागणी अनेक जणांकडून करण्यात येत होती. पूलाला पाणी लागत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ही वाहतूक बंद करण्यात आली होती, मात्र आता पोलीस बंदोबस्त घेत. बालिंगा पूलावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

तसेच उद्या पूलाला जर काय झालं तर काहीजण आम्हालाच विचारले असते की वाहतूक का सुरू केली. बालिंगा पूलाला दुसरा पर्याय व्यवस्था नसल्याने ही मागणी होत होती. यामुळे बंद ठेवण्यात आले होते मात्र आता प्रायोगिक तत्त्वावर हे पूल सुरू करण्यात यावे असे सांगण्यात आले असल्याचे केसरकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed