डोंबिवलीत राहणाऱ्या आरोपी काशिनाथ पाटील याने इंस्टाग्रामवर एका अल्पवयीन मुलीची ओळख केली. त्यानंतर त्याने मुलीला आपल्या जाळ्यात ओढत डोंबिवली पश्चिम येथे भेटण्यास बोलवले आणि संधीचा फायदा घेत तिचा गैरफायदा घेतला. आरोपी काशीनाथ याने २४ जुलै रोजी तिला बाहेर बोलून घेतले.
दुपारी गेलेली मुलगी परत घरी आलीच नाही म्हणून मुलीच्या कुटुंबीयांनी २५ जुलै रोजी त्यांची मुलगी हरवली असल्याची तक्रार टिळकनगर पोलीस ठाण्यात केली. यासंदर्भात पोलीस स्टेशनच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अधिकारी एम.पी. मुंजाळ यांच्या पथकाने तपास सुरू करत आरोपी काशिनाथ पाटील याला डोंबिवली पश्चिमेतून अटक केली.
२९ वर्षीय आरोपी काशिनाथ पाटील हा डोंबिवली पूर्वेत राहणारा असून याच्या विरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांच्याकडून सांगण्यात आले.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अटक आरोपी काशिनाथ पाटील याने पीडित मुलीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्तापित केले. यावरुन तिची फिर्याद घेऊन सदर गुन्हयास भादवी ३७६, पोक्सो ४, ६, ८, १२ असे वाढीव कलम लावण्यात आले आहे.