• Sat. Sep 21st, 2024

दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे नियतीने हार मानली, डॉक्टर म्हणाले, दोन महिने जगेल, आज ती १२ वर्षांची!

दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे नियतीने हार मानली, डॉक्टर म्हणाले, दोन महिने जगेल, आज ती १२ वर्षांची!

इंदापूर : जन्मानंतर अवघ्या एक ते दोन महिन्यापर्यंत जगेल असे भाकीत खुद्द डॉक्टरांनीच केले होते. मात्र ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील जन्मजात अपंगत्व आलेल्या तनुजाकडे पाहिल्यावर येतो.

तनुजा जन्माला आली तेव्हा ती अवघ्या एक ते दोन महिने जगेल असे भाकीत डॉक्टरांनी केले होते. कारण तिला जन्मजातच मणक्याचा संपूर्ण भाग नसल्याने ती चालू व बसू शकणार नव्हती. नियतीने तिचं जन्मतःच जगण्याचं बळ हिरावून घेण्याचा प्रयत्न केला खरा, पण तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे नियतीलाही हार मानवी लागली. ती जिंकली.. जन्मतःच चालण्याचं, स्वतः काही करण्याचं सगळं बळ गमावून बसलेली तनुजा आज भिगवणमधील एक आदर्श मुलगी बनली आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार ‘मातोश्री’च्या दारात आले तर..? राऊतांचा प्रश्न, उद्धव यांचं ‘बाळासाहेब स्टाईल’ने उत्तर
दोन महिन्यांचं आयुष्य लाभेल, असे सांगितलेली तनुजा आज बारा वर्षांची झाली असून ती इयत्ता पाचवीत शिकत आहे. तनुजाला जन्मजात संपूर्ण मणक्याचा भाग नसला तरी ती वडीलांचा शुध्द पाण्याचा व्यवसाय ताठपणे सांभाळत आहे. या व्यवसायातून ती महिनाकाठी आठ ते दहा हजार रुपये मिळवून देते. आजार व अपंगत्वाला कंटाळून तसेच इतर कारणामुळे नैराश्य आलेले अनेक जण आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलतात. पण इथे तनुजाचा आदर्श घेण्यासारखा आहे.

विशेष म्हणजे तिच्या माणुसकीच्या वागण्याने तिने साऱ्यांनाच आपलेसे केले आहे, सर्वजण तिच्याशी सहानुभूतीने वागतात आणि तीही आपल्या वाट्याचे दुःख विसरून अगदी सामान्य मुलांसारखेच व्यवसायाचा सारा व्यवहार पाहते. तनुजाची आई प्रतीक्षा,आजी शांता,आजोबा पंडित, बालमैत्रीण अपेक्षा गाडे तिचे खास आधार आहेत.

माझ्या शेतातून जायचं नाही, मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांची शेतकऱ्याने वाट अडवली, अंत्यसंस्कार दिवसभर रखडले
तनुजाचे वडील गणेश शेळके म्हणाले की, तिच्या जन्मावेळी मुलगी झाल्याचा खूप आनंद झाला मात्र नियतीने तिच्यापुढे एवढे काही वाढून ठेवले याची कल्पनाही आम्ही केली नव्हती. दोन वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तिच्या आजाराविषयी माहिती दिली व ती अल्पायुषी असल्याचे सांगण्यात आले. मात्र नशिबावर विश्वास ठेवला आणि अखेर तिचे पाऊल आमच्या घरासाठी लक्ष्मी घेऊन आल्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. घरात कोणतीही वस्तू आम्ही घेतली तर तिचे पाऊल त्या वस्तूवर उमटवतो. तिच्या आगमानने परिस्थिती बदलली आहे.

अरे काय ही दुर्दैवी अवस्था! रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला झोळीत बसवून रुग्णालयात नेण्याची वेळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed