• Sun. Sep 22nd, 2024
४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटात होणार, दहिसर – मीरा-भाईंदर मुंबईशी जोडणार;कसा असेल लिंक रोड

​५.३ किलोमीटर लांब एलिवेटेड रोड

​५.३ किलोमीटर लांब एलिवेटेड रोड

मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त उल्हास महाले यांनी सांगितलं, की २५ जुलै रोजी यासंबंधीत टेंडर एल अँड टीकडे देण्यात आलं आहे. वर्क ऑर्डर जारी करण्यात आल्यानंतर ४२ महिन्यात कंपनीला हा प्रोजेक्ट पूर्ण करावा लागेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची असेल, अशी माहिती बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली. या प्रकल्पांतर्गत दहिसर खाडीमध्ये जवळपास १०० मीटर लांबीचा स्टीलचा पूल बांधण्यात येणार आहे. एकूण ५.३ किलोमीटर लांब एलिवेटेड रोडसाठी एकूण ३३० खांब बनवण्यात येणार आहेत. संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. दररोज जवळपास ७५ हजार वाहनं या लिंक रोडचा वापर करतील असा अंदाज बीएमसीने व्यक्त केला आहे.

दहिसर चेक नाक्यावर ट्रॅफिक कमी होणार

दहिसर चेक नाक्यावर ट्रॅफिक कमी होणार

इथे आधुनिक तंत्रज्ञानाने ७ मजली पार्किंग करण्यात येणार आहे. या पार्किंगमध्ये ५५० वाहनं पार्क करता येतील. याशिवाय बस टर्मिनल आणि ट्रान्सपोर्ट हब देखील असेल, जे मेट्रोला जोडलं जाईल. पुलावर दोन्ही बाजूला चार लेन रस्ते असतील. यामुळे दहिसर चेक नाक्यावर ट्रॅफिकचा जवळपास ३५ टक्के भार कमी होईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली.

४५ मिनिटांचं अंतर १० मिनिटांत पार होणार

४५ मिनिटांचं अंतर १० मिनिटांत पार होणार

दहिसर ते भाईंदर हा प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर येथील रहिवाशांना मोठा फायदा होणार आहे. रस्त्यात ट्रॅफिक असताना हा मार्ग पार करताना ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र या लिंक रोडनंतर हे अंतर केवळ १० मिनिटांत हे अंतर पार करता येणार आहे. मुंबई आणि एमएमआर दरम्यान रस्ते सेवा सुधारण्यासाठी महापालिका अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. त्यात दहिसर ते मीरा-भाईंदर दरम्यान बांधण्यात येत असलेला कोस्टल रोड हा मुख्य प्रोजेक्ट आहे. या कोस्टल रोडच्या बांधकामामुळे मुंबईहून मीरा-भाईंदर, वसई-विरार, पालघर, गुजरात, राजस्थान आणि दिल्लीकडे जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीच्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही.

​कोस्टल रोडमुळे दहिसर – मीरा – भाईंदर थेट दक्षिण मुंबईशी जोडली जाणार

​कोस्टल रोडमुळे दहिसर - मीरा - भाईंदर थेट दक्षिण मुंबईशी जोडली जाणार

या लिंक रोडमुळे दहिसर – मीरा – भाईंदरमधील अंतर कमी होऊन मुंबईशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. वाहतुकीची समस्या दूर झाल्याने प्रवाशांच्या वेळेसोबत इंधनाचीही बचत होणार आहे. या कोस्टल रोडमुळे दहिसर – मीरा – भाईंदर ही उपनगरं थेट दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंटशी जोडली जातील. नरिमन पॉइंट ते वरळी सी लिंक, पुढे सी लिंक मार्गे बांद्रा, त्यानंतर बांद्रा ते वर्सोवा, वर्सोवा ते कांदिवली कोस्टल रोड ते दहिसर असा कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. दहिसर-भाईंदर कोस्टल रोडच्या बांधकामामुळे दक्षिण मुंबईतून लोकांना थेट मीरा-भाईंदरपर्यंत प्रवास करता येणार आहे.

कधीपर्यंत सुरू होणार मार्ग?

कधीपर्यंत सुरू होणार मार्ग?

मुंबई महानगरपालिकेने दहिसर ते भाईंदरदरम्यान ५.३ किमी लांब कोस्टल रोडची योजना तयार केली आहे. दहिसर ते भाईंदर हा लिंक रोड कांदरपाडा मेट्रो स्टेशन लिंक रोड दहिसर पश्चिमपासून सुरू होईल आणि सुभाषचंद्र बोस ग्राउंड भाईंदर वेस्टपर्यंत जाईल.

​दहिसर – भाईंदर दरम्यान लिंक रोडचा प्रस्ताव २०१६ मध्ये समोर आला होता. पण तब्बल ७ वर्षांनी आता या प्रोजेक्टसाठी कंपनीचं नाव फायनल करण्यात आलं आहे. २०२६ पर्यंत दहिसर- मीरा रोड – भाईंदर या कोस्टल रोडचं काम पूर्ण होईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed