• Sat. Sep 21st, 2024

कर्जत जामखेड MIDC ची अधिसूचना काढा, अन्यथा तीव्र आंदोलन, रोहित पवारांकडून आंदोलनाचा इशारा

कर्जत जामखेड MIDC ची अधिसूचना काढा, अन्यथा तीव्र आंदोलन, रोहित पवारांकडून आंदोलनाचा इशारा

अहमदनगर: जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच कर्जत जामखेडच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी काल विधानसभेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून भर पावसात आंदोलन केले होते. “कर्जत जामखेडमध्ये रोजगाराच्या अडचणी सुटाव्या म्हणून एमआयडीसी आवश्यक आहे, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली. गेल्या वर्षभरात अनेकवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांना भेटून अधिसूचना काढावी यासाठी विनंती करुनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस पाऊले उचलण्यात येत नव्हती, असं रोहित पवार म्हणाले होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर रोहित पवार यांनी उपोषण मागं घेतलं होतं. उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आज बैठक झाली नसल्यानं रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच यापुढे या प्रश्नी तीव्र आंदोलन उभारणार असल्याचं म्हटलं.

रोहित पवार काय म्हणाले?

माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना काढण्याबाबत आज दुपारी अडीच वाजता बैठक घेण्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्यामुळं काल उपोषण मागे घेतलं होतं, असं रोहित पवार म्हणाले. त्यानुसार मी आणि सर्व अधिकाऱ्यांनी तब्बल साडेचार तास वाट पाहूनही उद्योगमंत्री बैठकीला आले नाहीत. त्यामुळं माझी तर फसवणूक झालीच पण माझ्या मतदारसंघाचीही फसवणूक करून संपूर्ण राज्यातील युवांविषयीचा दृष्टिकोन या सरकारने आपल्या कृतीतून दाखवून दिला, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासनाचे मोठे पाऊल, दरडींपासून धोका असलेल्या ५७१ कुटुंबे व १७०१ लोकांचे स्थलांतर
विरोधकांना ‘सावत्रभावाची’ वागणूक देण्याचा हा अत्यंत निंदणीय प्रकार आहे. तरीही माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की एमआयडीसीची अधिसूचना तातडीने काढून माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय द्या, अन्यथा माझ्या मतदारसंघातील युवांच्या आणि नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता याच अधिवेशनात पुन्हा तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.

मध्यरात्री चिखलात अडीच किलोमीटरची पायपीट, प्रसूतीवेदना अन् पाऊस, गर्भवती महिलेचा मृत्यू ,मन सुन्न करणारी घटना

दरम्यान, राज्य सरकार कर्जत जामखेडमधील एमआयडीसीच्या प्रश्नावर कधी मार्ग काढणार हे पाहावं लागेल.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार ३ वनडे आणि पाच टी-२०, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed