• Sat. Sep 21st, 2024
संभाजीराजे जमिनीच्या पोटात गडप झालेल्या इर्शाळवाडीत पोहोचले; संहार पाहून डोळे टचकन पाणावले

रायगड: जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या गंभीर दुर्घटनेची स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे यांनी पाहणी केली. इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेत २७ नागरिक मृत घोषित करण्यात आलेले असून अजूनही ५७ नागरिक बेपत्ता आहेत. इर्शाळवाडी गावातील सर्व नागरिकांचे व्यवस्थित पुनर्वसन व्हावे आणि प्रत्येक कुटुंबियांना किमान २५ लाख रुपयांची मदत शासनाने करावी, अशी मागणी यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
इर्शाळवाडीमधील दरडग्रस्त कुटुंबांना मिळणार तीन गुंठे जागा, घरंही उभारण्यात येणार
संभाजीराजे यांना इर्शाळवाडीमधील गंभीर परिस्थिती पाहून अश्रू अनावर झाले. स्वराज्य पक्षाच्या वतीने संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या उपस्थित सहकाऱ्यांनी इर्शाळवाडीतील नागरिकांसाठी आवश्यक कपडे, जीवनावश्यक वस्तू आणि आर्थिक स्वरूपात सहाय्य केले. इर्शाळवाडी येथे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या मुलांना राज्य शासनाने अधिकृतरित्या दत्तक घ्यायला हवे, अशी मागणी करून राज्यभरातून इर्शाळवाडीतील बांधवांसाठी मदत करण्याचे आवाहन देखील संभाजीराजे यांनी यावेळी केले.

सांत्वन करताना लाज वाटली, दुर्घटनाग्रस्तांच्या भेटीनंतर ठाकरे उद्विग्न

स्वराज्य पक्षाच्या बार्शी आणि वैराग येथील पदाधिकाऱ्यांनी संभाजीराजे यांच्या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक योगदान जमा केले आहे. यावेळी स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष विनोद साबळे, सुनील पाटील, गणेश कडू, राजेश लाड, शशिकांत मोरे, अनिल भोसले, केतन निकम, धनश्री दिवाने, कमलाकर लबडे, प्रथमेश मोरे, नंदू मोरे, प्रकाश पालकर, प्रथमेश पाळेकर, सर्वार्थ सेवा संगम शेळगाव चे संस्थापक विश्वास थोरात, स्वराज्य पक्षाचे दहिटणे येथील पदाधिकारी प्रशांत काशीद, सूरज सौंदळे, आदेश घोंगाणे, कृष्णा काशीद, प्रविण काशीद, करण पवार आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed