• Sat. Sep 21st, 2024

मंत्रिपदाची हुलकावणी पण बच्चू कडूंनी करुन दाखवलं, अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी

मंत्रिपदाची हुलकावणी पण बच्चू कडूंनी करुन दाखवलं, अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी

अमरावती: गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या एकहाती सत्तेचे केंद्र असलेले अमरावती जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत शिंदे फडणवीस व पवार यांच्या युतीचा प्रभाव दिसून आला. आज झालेल्या निवडणुकीत बच्चू कडू यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून अभिजीत ढेपे यांची निवड करण्यात आली.

Cabinet Expansion: बच्चू कडू म्हणाले, मंत्रिपदावरचा दावा सोडतो, तितक्यात CM शिंदेंचा कॉल गेला अन् चक्रं फिरली

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मागील अनेक वर्षांपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक हाती सत्ता होती. काँग्रेस मधील आजी-माजी पदाधिकारी यांनी ही सत्ता अनेक वर्षांपासून टिकून ठेवली होती. त्याच पार्श्वभूमीवर या पाच वर्षाच्या टर्ममध्ये प्रत्येकाला एक वर्ष अशा पद्धतीने काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला होता. यावर बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत आपले उमेदवार निवडून आणले होते. बँकेचे यापूर्वीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून राजीनामा दिला होता. त्यामुळे या ठिकाणी नव्याने निवडणुका घेण्यात आल्या होत्या. दरम्यानच्या काळात राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनाचा प्रभाव या ठिकाणीही दिसून आला. आज झालेला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चांदुर रेल्वे मतदार संघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप विरुद्ध शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू अशी निवडणूक रंगली होती. यामध्ये बच्चू कडू यांनी बाजी मारली.

शिंदे-फडणवीस सरकारसोबत राहणार का? आमदार बच्चू कडू यांचं आता मोठं वक्तव्य

दीड वर्षाचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्ष सुधाकर भारसाकळे व उपाध्यक्ष सुरेश साबळे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. आता पुन्हा एकदा पुढील दीड वर्षासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणुका झाल्या. जिल्हा उपनिबंधकांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. बबलू देशमुख तसेच अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलकडे पूर्ण बहुमत काँग्रेसला ही निवडणूक फारशी कठीण जाणार नाही, अशी चर्चा सुरु होती. बच्चू कडू यांनी ऐनवेळी बाजी पलटवत काँग्रेसची तीन मते फोडून विजय संपादन केला. मात्र, शिंदे-फडणवीस-पवार गटाच्या युतीमुळे सर्व समीकरणे बदलली. बच्चू कडू यांनी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना धूळ चारत जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. आमदार यशोमती ठाकूर व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed