दुपारी तीन वाजले तेव्हा कामगारांकडून काम सुरु होतं. ज्या दरडी सैल झालेल्या आहेत त्या पाडण्याचं काम सुरु आहे. अर्धा तास पाऊस झाल्यानं रस्त्यावर चिखल झाला होता. वेगानं येणारी वाहनं या चिखलातून घसरु शकतात. त्यामुळं रस्त्यावर पडलेला राडारोडा आणि सैल झालेल्या दरडी हटवल्या जात नाहीत तोपर्यंत ट्राफिक ब्लॉक काय राहणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर काल दरड कोसळल्यानंतर १६ तास झाल्यानंतर मार्ग बंद आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेन वर देखील वाहनांची गती कमी आहे.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर दोन ठिकाणी दरड कोसळली होती. दुपारी १२ ते २ पर्यंत मुंबईकडे येणारी लेन बंद करण्यात आली होती. मात्र, तीन तास झाले तरी मार्ग बंद आहे. रस्त्यावर पडलेला राडारोडा दुपारी तीन पर्यंत हटवण्यात यश आलं आहे. दुपारी तीनपर्यंत पाच टक्के राडारोडा शिल्लक होता.
मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील मुरुम आणि इतर राडारोडा जेसीबी आणि डंपरच्या सहाय्यानं हटवला जात आहे. दुसरीकडे पुढील काळात सैल झालेल्या दरडी कोसळू नये म्हणून प्रशासनाकडून सैल झालेल्या दरडी हटवण्यात येत आहेत. थोड्या वेळातच मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत होऊ शकते.
जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक वळवली
एमएसआरडीसी आणि प्रशासनानं मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ट्राफिक ब्लॉक घेताना मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे वळवली होती.