• Mon. Nov 25th, 2024

    कामचुकार कर्मचाऱ्यांना पीएमपीचा मोठा दणका; गैरहजर राहणाऱ्या ३६ कर्मचारी निलंबित, ३ बडतर्फ

    कामचुकार कर्मचाऱ्यांना पीएमपीचा मोठा दणका; गैरहजर राहणाऱ्या ३६ कर्मचारी निलंबित, ३ बडतर्फ

    पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्षांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी झाडाझडती सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कामावर सतत गैरहजर राहणाऱ्या ३६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये ३० वाहक तर सहा चालकांचा समावेश आहे. तर, तीन कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. पीएमपीच्या अध्यक्षांनी केलेल्या कारवाईमुळे अनेक वाहक व चालकांचे धाबे दणाणले आहेत.

    पीएमपीच्या अध्यक्ष पदांचा कार्यभार घेतल्यानंतर सचिंद्र प्रताप सिंह यांनी पीएमपीच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा मिळावी, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, जास्तीत जास्त बस मार्गावर संचलनात असाव्यात, कामात शिस्त लागावी म्हणून कामाला सुरूवात केली आहे. पीएमपीच्या १५ डेपोमधील अनेक कर्मचारी सतत आचानक सुट्टी घेणे, अनेक दिवस कामावर गैरहजर राहत असल्याचे त्यांना दिसून आले होते. त्यामुळे आचानक गाड्या रद्द करण्याची वेळ पीएमपीवर येत असल्याचे समजले.

    पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी घटना, मालेगावात गुप्त धनासाठी ९ वर्षांच्या मुलाचा नरबळी, भोंदू बाबासह ४ अटकेत
    त्यानंतर पीएमपी अध्यक्षांनी कामात शिस्त असावी म्हणून सतत गैरहजर राहणाऱ्या ३० वाहक व सहा चालकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच, दोन चालक व वर्कशॉपमधील एक कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर यापुढे देखील कठोर कारवी केली जाणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

    धक्कादायक! महिलांची अंतर्वस्त्र चोरायचा, ती परिधान करून महीलांसमोर करायचा अश्लील डान्स
    अचानक गैरहजर राहणाऱ्या १४२ कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र

    पीएमपीतील विविध विभागांच्या प्रमुखांना एक डेपो दत्तक दिला आहे. त्यांनी प्रत्येक शनिवारी पहाटे पाच ते सकाळी ११ दरम्यान डेपोत उपस्थित राहून प्रवाशांना चांगली सेवा मिळते का हे पाहण्याचे आदेश नवीन पीएमपी अध्यक्षांनी दिले आहेत. २२ जुलै रोजी केलेल्या पाहणीत विविध डेपोमधील १४२ वाहक व चालक आचानक गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहे. यामध्ये ७८ वाहक व ६४ चालकांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.

    सातपुडा पर्वत रांगांमध्ये ढगफुटी, मुक्ताईनगरमध्ये हाहाकार, मातीचा बंधारा फुटून सहा गावांमध्ये शिरले पाणी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed