नाशिक: नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून आईला घेण्यासाठी येणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आई मागील ४ दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालायत उपचार घेत होती. आईला रुग्णालयातून सोडण्यात येणार होते. तिला घरी घेऊन येण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथून मुलगा येत असताना द्वारका चौफुली जवळीत ट्रॅक्टर हाऊस समोर पुलावर अपघात होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आकाश कैलास कोटकर (२२, रा. पिंपळगाव बसवंत) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आकाशची आई जिल्हा शासकीय रुग्णालयात मागील काही दिवसांपासून उपचार घेत होती. तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे शनिवारी (दि. २२) डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना घरी सोडण्यात येणार होते. आईला घरी घेऊन जाण्यासाठी आकाश कोटकर हा पिंपळगांव बसवंत येथून नाशिककडे येत असताना द्वारका चौफुली नजीक ट्रॅक्टर हाऊस याठिकाणी उड्डाणपुलावर त्याचा भीषण अपघात झाला. उड्डाणपुलावर एक कंटेनर बंद अवस्थेत उभे होते. मागून दुचाकी वर येणाऱ्या आकाशला त्याचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकीची कंटेनरला मागून जोरात धडकली. यातच आकाश आणि त्याचा मित्र गंभीर जखमी झाले.

त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालायत दाखल करण्यात आले असता आकाशला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. तर त्याच्या मित्रावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक कंटेनर लॉक करून पसार झाला आहे. यामुळे पोलिसांना तो कंटेनर बाजूला करता आलेला नाहीये. या अपघातानंतर उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आकशच्या मित्राचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत.