• Mon. Nov 25th, 2024
    इर्शाळवाडी दुर्घटना कळताच गावी धाव, जाऊन पाहिलं तर सारं सपाट झालेलं, मामा-मामा आवाज देताच…

    नवी मुंबई: रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोळलेल्या ढिगाऱ्यात अडकलेल्या जखमींपैकी दोन जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमी रुग्णांची नावे प्रवीण डावरे, यशवंत पारधी असे असून दोघांवरती उपचार सुरू असून त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांची धडपड सुरू होती. परशुराम निर्गुड यांच्या मामाचे कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले. तर सुरेश भस्मा यांचे सासरे, सासू आणि इतर व्यक्ती ढिगाऱ्याखाली सापडले होते.

    दरड कोसळेल याची कल्पनाही त्यांना नव्हती. गाव डोंगरात असल्यामुळे चालायला रस्ता ही नाही, आजूबाजूला कोणत्याही सुविधा नाहीत. मात्र, दरड कोसळल्याची घटना घडल्याचं समजतातच मामाच्या गावात धाव घेतली. होत्याच नव्हतं झालं, मामा, मामी, आजी, आजोबा आणि इतर व्यक्ती धरून सात व्यक्ती राहत होत्या. मात्र, दरड कोसळताच ढिगाऱ्याखाली सर्व कुटुंब गेल होतं.
    Khalapur Landslide: अख्खं कुटुंब ढिगाऱ्याखाली, एकटी मुलगी वाचली, खालापूर दुर्घटनेनं जयश्रीचं सारं हिरावून नेलं
    गावात पोहचताच गाव सपाट झालेलं होतं, चारही बाजूने काहोर माजलेला होता. मात्र, मन घट्ट करून कोणी आहे का?, मामा-मामा असा आवाज दिला. मात्र, चारही बाजूला सपाट झालेली घरे आणि एकच आवाज होता वाचवा वाचवा. संपूर्ण गावात भयानक वातावरण निर्माण झालं आहे. मामाची मुलं ही दिसेनाशी झाली. संपूर्ण कुटुंब विखरलं नशिबाने मामा वाचले. पण, तेही हॉस्पिटलमध्ये संपूर्ण घर उध्वस्त झालं.

    इर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर, नातेवाईकांचा मन हेलावणारा हंबरडा

    डोळ्यांनी पाहिलेलं दृश्य डोळ्यासमोरुन जात नाहीये. इतकी भयानक मन हेलवणारी परस्थिती झाली. मामाला काय उत्तर देऊ काळीज जड झालं आहे. हॉस्पिटलमध्ये येऊन बाहेर बसलो मामाला ही भेटता येईना, चौकच्या हॉस्पिटलमध्ये मामाला नेलं आणि नंतर एमजीएमला आणलं. मात्र, इथून पुढे काय करायचं समजेनासे झालं पैसे आज नाही, उद्या येतील आमच्या नातेवाईकांचं काय, बोलताना परशुराम निर्गुड यांना अश्रू अनावर झाले होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed