Pune Loan App user threatened : तक्रारदाराच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांकांना त्याचे एडिटेड फोटो पाठवण्याची; तसेच सामाजिक माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन बदनामी केली.
याबाबत २९ वर्षीय तक्रारदाराने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांक आणि लिंक वापरणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ पासून हा प्रकार सुरू आहे. आरोपीने तक्रारदाराला कर्ज ॲपच्या माध्यमातून ३० हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगून ते पैसे परत भरण्यास भाग पाडले. त्यानंतर तक्रारदाराचे फोटो एडिट करून आक्षेपार्ह स्वरूपात तयार केले. ते तक्रारदाराच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांकांना पाठवण्याची; तसेच सामाजिक माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन बदनामी केली. अशा प्रकारच्या लोन ॲपद्वारे धमकी देण्याच्या घटना काही महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात घडत होत्या.
या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्मिता वासनिक करीत आहेत. दरम्यान, अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे अनोळखी लोन ॲप वापरताना आणि कोणत्याही लिंकवर क्लिक करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Crime News : ताई मावशीचा जीव घेतला, हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं भासवलं, बॉयफ्रेण्डची टिप आणि मायलेक अडकले
एक महिना ‘आभासी’ अटकेत
दुसरीकडे, जवळपास एक महिना आभासी अटकेची भीती दाखवत एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला तब्बल १ कोटी ५६ लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर पूर्वेला राहणाऱ्या संबंधित व्यक्तीला १२ फेब्रुवारी रोजी मोबाइलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने आपण दिल्लीतील टेलिकॉम विभागातून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून सुमारे ४० महिलांना अश्लाघ्य संदेश आणि व्हिडिओ कॉल केल्याची तक्रार त्याच्याकडे आल्याचे त्याने सांगितले. यानंतर कॉल मुंबई क्राइम ब्रँचशी जोडत असल्याचे सांगून संबंधित व्यक्तीने आधारकार्ड व इतर वैयक्तिक माहिती घेतली.
Stuti Sonwane : तूही कधीतरी फ्रीजमध्ये सापडशील… मुंबईत 24 वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, प्रियकरावर संशय, सोनवणे कुटुंब शोकसागरात
तसेच, त्यांच्या पत्नीच्या मोबाइलमध्ये सिग्नल ॲप डाउनलोड करण्यास सांगून त्याद्वारे बनावट एफआयआर, इंटरपोल रेड नोटीस, बँकेची कागदपत्रे आणि विविध आधारकार्डच्या प्रती पाठवण्यात आल्या. फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःला पोलिस अधिकारी, सीबीआय अधिकारी आणि न्यायालयातील अधिकारी असल्याचे सांगत त्यांना व्हिडिओ कॉलवर ठेवून भीतीचे वातावरण निर्माण केले.
