रावेर तालुक्यातील आज बुधवारी अतिवृष्टी झाली आहे. सतत नऊ तस्नाच्या पावसामुळे रावेर शहरातून गेलेक्या नाझजीरी नाल्याला पूर आल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले.
अतिवृषिमुके रावेर तालुक्यातील आभोडा, गारबर्डी धरण १०० टक्के भरले आहे. सुकी नदीला पूर आल्याने रावेर तालुक्यातील काही गावामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे, विवरे गावात वाघाडी नाल्याला पूर आल्याने गा वात काही घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहे.
अतिवृष्टीमुळे सुकी नदीला पूर आल्याने रावेर तालुक्यातील उंटखेडा कुंभारखेडा, पाल आणि खिरोदा या रस्त्यावरील वाहतूक बंद पडले आहे.
विवरे गावांमध्ये नागरिकांकडून बचाव कार्य सुद्धा सुरू आहे. वाहून जाणाऱ्या वस्तू तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळे घालवण्यासाठी ग्रामस्थ मदत करत आहेत.
या अतिवृष्टीमुळे रावेर तालुक्यात शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे मात्र यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत रावेर तालुक्यात कुठलीही जीवित हानी झाले नसल्याची माहिती समोर येत आहे.