• Sat. Jun 6th, 2026
    रायगडात धो-धो पाऊस, नद्या धोकादायक पातळीवर; अजित पवारांचे जिल्हा प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश

    मुंबई: रायगड जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना दूरध्वनी करून त्यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण होणारी पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटना, त्यामुळे करावे लागणारे नागरिकांचे स्थलांतर लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची कार्यवाही तातडीने आणि शक्यतो दिवसाच पूर्ण करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
    Parshuram Ghat Closed : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प, परशुराम घाटात दरड कोसळली; कोकणात पावसाचा हाहाकार
    कोकणासह राज्यातील अनेक भागात पुढील चार दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी करुन आपत्कालीन मदत यंत्रणा चोवीस तास सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले.

    भर पावसात जीव वाचवण्यासाठी ६ तास थरार, ओढ्याचे पाणी वाढले, अडकलेले १०० पर्यटक दोरीच्या साह्याने बचावले!

    नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क करावे. गतवर्षांचा अनुभव लक्षात घेता बचाव आणि मदतकार्य रात्रीच्या वेळी करण्यात अडचणी येतात. त्यामुळे पुरामुळे बाधित नागरिकांचे स्थलांतर तातडीने करावे, शक्यतो ही कार्यवाही दिवसा पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी. आपत्तीग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करावा. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

    सामान्य नागरिकांच्या जीवनात सुकरता आणण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे – अपर मुख्य सचिव विकास खारगे – महासंवाद
    व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी – महासंवाद
    Pune News : यात्रेतून चादर खरेदी केली, घरी धुतल्यानंतर नको ते दिसलं, बेडशीटच्या लेबलवर ‘मेड इन पाकिस्तान’, पुण्यात धक्कादायक प्रकार; Video

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed