यावर्षी पुन्हा त्याच परिसरात जवळपास दोन फूट पाणी भरले आहे. केळस्कर नाका या दापोली शहराच्या मध्यवर्ती परिसरात पाणी भरले आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळे दापोली शहरात मध्यवर्ती ठिकाणी पाणी भरल्याने पुन्हा एकदा आश्चर्य व्यक्त होत आहे. दापोली नगरपंचायतीच्या सत्ताधारी असलेल्या कारभारी यांच्यावरही नगर कडून जाहीरपणे नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले जात आहेत. याच भरलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढत वाहने पुढे न्यावी लागत आहेत.
दापोली तालुक्यातील पावसाचे अपडेट
> खेड दापोली हा मुख्य राज्यमार्ग पाण्यासाठी गेल्याने वाहतूक बंद
> हर्णे फत्तेगड व राजेवाडी तसेच पाजपंढरी येथून दरडगस्त भागातील ५ कुटुंबातील २४ लोकांना यापूर्वी स्थलांतरित करण्यात आले आहे .
> मौजे दाभोळ येथील ढोरसई येथील आपदग्रस्त/दरडग्रस्त ५ कुटुंब व ३५ लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
> शिरसोली मुगिज रस्ता पाणी आल्याने वाहतूक बंद आहे
> जालगाव समर्थ नगर, मित्रनगर भागात अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी साचत आहे. संबधित ग्रामपंचायत मार्फत लोकांना सूचना दिलेल्या आहेत.
> दापोली मंडणगड रस्त्यावर झाडे पडली होती ती काढून रस्ता पूर्ववत केला आहे.
> सोळा घरांचे अतिवृष्टीमुळे अंशतः नुकसान झालेले आहे.
> भडवले वावघर रस्त्यावरील कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. तसेच वावघ चिकटे वाडी ग्रामीण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
खेड तालुक्याला पावसाने झोडपले
कोकणात फक्त दापोलीच नाही तर खेड तालुक्यात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. जगबुडी नदीच्या बाजूला असलेल्या झोपडप्टटीतील लोकांना मुकादम हायस्कूल येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.