सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
सातारा : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चार दिवसात धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या धरणात २८.३२ टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाणी पातळी २०७३ झाली आहे. धरणात २४ हजार ९८२ क्यूसेक्स पाण्याची आवक होत आहे. काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना ५४ व नवजा परिसरात ५७ मिलिमीटर, तर महाबळेश्वरला ८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.