• Sat. Sep 21st, 2024

धक्कादायक! लहान येथील अंगणवाडीच्या खाऊत निघाल्या आळ्या, बालकांची प्रकृतीविषयी आले अपडेट

धक्कादायक! लहान येथील अंगणवाडीच्या खाऊत निघाल्या आळ्या, बालकांची प्रकृतीविषयी आले अपडेट

नांदेड : अंगणवाडीमध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात चक्क अळ्या निघाल्याची घटना घडली आहे. जिल्हातील अर्धापूर तालुक्यातील लहान येथील अंगणवाडी तीन मधील हा प्रकार आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी संताप व्यक्त करत संबंधीत विभागाकडे तक्रार केली आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, लहान येथील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये मंगळवारी सकाळी बालकांना पोषण आहारात गव्हाच्या लापसीचे वाटप करण्यात आले. काही बालकांनी आहार खाल्ला वतर काही बालकांनी आहार घरी नेला. शालेय पोषण आहार घरी नेल्यानंतर काहींना आहारात अळ्या पालकांच्या निदर्शनास आले. पालकांनी तात्काळ अंगनवाडी पोहचून तेथील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ‌यांना‌ जाब विचारला. संताप व्यक्त करत पालकांनी थेट एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

बाळासाहेब थोरात दिसले विरोधीपक्ष नेत्याच्या आवेशात, प्रश्न मांडले, सरकारला धारेवरही धरले
त्यानंतर एकात्मिक महिला व बालविकास अधिकारी अधिकारी मयुरी पुणे यांनी अंगणवाडीला भेट दिली. पंचनामा तयार करून अहवाल तयार केला आला आहे. चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी माहिती मयुरी पुणे यांनी दिली आहे. दरम्यान ज्या बालकांनी गव्हाच्या लापसीचे सेवन केले आहे, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दोघ्या सख्या बहिणींचे मोठे यश! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बनल्या प्रशासकीय अधिकारी, होतंय सर्वत्र कौतुक
सेविका व मदतनीस यांना कारणे दाखवा नोटीस

या प्रकरणी एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे यांनी लहान येथील अंगणवाडी क्रमांक तीनला भेट देऊन पाहणी केली असता आहारात अळ्या असल्याचे दिसून आले आहे.ज्या बालकांनी आहार खाल्ला त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. याप्रकरणी संबधीत अंगणवाडी सेविका व मदतनीस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती मयुरी पुणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

धक्कादायक! जातीयवादाचा गंभीर आरोप, गावातील १५० दलित कुटुंबं गाव सोडून मंत्रालयाकडे जाणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed