• Sat. Sep 21st, 2024

दोघ्या सख्या बहिणींचे मोठे यश! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बनल्या प्रशासकीय अधिकारी

दोघ्या सख्या बहिणींचे मोठे यश! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बनल्या प्रशासकीय अधिकारी

अहमदनगर : कुठल्याही परिस्थितीत आपल्याला प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे अशी मनाशी खूणगाठ बांधत प्रेरणा आणि संध्या फापाळे या दोन सख्ख्या बहिणींनी कसून अभ्यास केला आणि घरातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश मिळविले. प्रेरणा ही विक्रीकर निरीक्षक, तर संध्या ही मंत्रालयीन लेखनीक बनली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील मूळचे रहिवासी असणारे व सध्या संगमनेर शहरातील घोडेकर मळ्यात स्थायिक झालेले देविदास फापाळे यांनी मालपाणी इंडस्ट्रीमध्ये सुपरवायझर म्हणून काम पाहिले. तसेच डॉ सुधीर तांबे यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अनेक वर्षे आरोग्य सेवक म्हणून काम केले. फापाळे दापत्यांनी मोलमजुरी करून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मुलगा ईश्वर, मुलगी प्रेरणा व संध्या या तीनही मुलांना उच्च शिक्षण दिले.

धक्कादायक! जातीयवादाचा गंभीर आरोप, गावातील १५० दलित कुटुंबं गाव सोडून मंत्रालयाकडे जाणार
प्रेरणा व संध्या या दोन्ही मुलींचे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संगमनेर येथेच झाले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पुण्यात झाले. प्रेरणा हिला डॉक्टर व्हायचे होते. पण तिचा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला नाही म्हणून ती नाराज झाली. आपली परिस्थिती नाजूक असल्यामुळे खाजगी महाविद्यालयात डोनेशन भरण्यास पैसे नव्हते. म्हणून तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

विक्रीकर निरीक्षक होण्याचे स्वप्न झाले साकार

मात्र आता आपण प्रशासकीय सेवेत गेलो तर आपले प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल अशी मनाशी खूणगाठ बांधत प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आणि तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आठव्या प्रयत्नात अखेर तिला यश आले आणि ती विक्रीकर निरीक्षक या पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिचे विक्रीकर निरीक्षक होण्याचे स्वप्न साकार झाले.

कौतुकास्पद! पिंपळगाव सराईत सर्वधर्मसमभावाचे जिवंत उदाहरण, वारकरी महिलेचे मुस्लिम बांधवांकडून सत्कार
संध्या फापाळे हिने पद्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर तिचे लग्न झाले. परंतु घरातील कौटुंबिक वादामुळे घटस्फोट झाला आणि बहीण प्रेरणा ही जशी प्रशासकीय अधिकारी झाली तसेच आपणही अधिकारी बनून स्वतःच्या पायावर उभी राहू शकते असे तिने मनाशी पक्के ठरवले. त्यानंतर कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता तिने अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे तसेच बहिणीचे मार्गदर्शन घेतल्याने ती पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि तिची मंत्रालय लेखनिक या पदावर नियुक्ती झालेली आहे.

यवतमाळ हादरले! माजी सरपंचाच्या भावाची धारदार शस्त्राने निघृण हत्या, विश्वकर्मानगरातील घटना
क्लास वन होण्यासाठी प्रयत्न करणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून प्रेरणा फापाळे हिने वर्ग २ तर संध्या फापाळे हिची वर्ग ३ या पदावर नियुक्ती झालेली आहे. मात्र आम्ही दोघी यावर न थांबता क्लास वनची पोस्ट कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत आम्ही दोघी क्लास वन अधिकारी होणारच, असा मनाशी पक्का निश्चय प्रणाली देविदास फापाळे आणि मंत्रालय लेखनिक बनलेल्या संध्या फापाळे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed