• Sat. Sep 21st, 2024
पायात लोखंडी रॉड, एक तप व्यायामात खंड; हार न मानता पन्नाशी झालेला अवलिया देतोय जिमचे धडे

पन्नाशी पार अवलियाचा लूक चर्चेत

पन्नाशी पार अवलियाचा लूक चर्चेत

एखाद्या वीशीतल्या तरुणाला लाजवेल असा सुधीर देशमानेंचा फिटनेस आहे. पुण्यातील इंदापूर इथे सुधीर यांची स्वत:ची जिम आहे. पांढरीशुभ्र दाढी आणि केस, पिळदार शरीर, गळ्यात पाच – पाच किलोच्या तीन लांबलचक साखळ्या हा त्यांचा लूक पाहून कोणालाही अप्रूप वाटेल. गळ्यात पाच – पाच किलोच्या तीन लोखंडी साखळ्या अडकवून ते व्यायाम करताना दिसतात. अशाप्रकारे व्यायाम केल्याने मानेच्या शिरांचा चांगला व्यायाम होत असल्याचंही ते सांगतात.

अपघातानंतर लोखंडी रॉड पायात टाकला, १२ वर्ष व्यायामात खंड

अपघातानंतर लोखंडी रॉड पायात टाकला, १२ वर्ष व्यायामात खंड

लहानपणापासूनच व्यायामाची आवड असणारे सुधीर देशमाने १९९० पासून जिमकडे वळले. ११९० ते २०१२ सालापर्यंत त्यांनी व्यायाम केला. २०१२ मध्ये दुर्दैवाने त्यांच्या पायाला दुखापत झाली. अपघातानंतर लोखंडी रॉड त्यांच्या पायात टाकण्यात आला. अपघात, दुखापतीनंतर एक तप म्हणजे तब्बल बारा वर्ष त्यांच्या व्यायामात खंड पडला. मात्र उपजतच व्यायामाची आवड असल्याने ते या अपघातातून सावरत त्यांनी पुन्हा नव्या जोमाने व्यायामाला सुरुवात केली.

अनेक तरुण-तरुणींना देतात व्यायामाचे धडे

अनेक तरुण-तरुणींना देतात व्यायामाचे धडे

देशमाने यांच्या जिममधून प्रशिक्षण घेतलेली अनेक मुलं – मुली आज बॉडी बिल्डिंग क्षेत्रात उतरली आहेत. पन्नाशी पार केलेल्या, पांढरीशुभ्र दाढी असणाऱ्या सुधीर देशमाने यांच्याकडे शेकडो तरुण – तरुणी प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या आहाराबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, की ते आहारात चिकन, मासे, हिरव्या पालेभाज्या खातात. आहार चांगला असेल तर शरीरही चांगलं राहतं, असंही ते म्हणाले. सोबत व्यायामाची जोड आहेच. त्यामुळे अजूनही ३० ते ३५ वर्ष आता आहे त्याच जोमाने काम करत राहू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

हल्लीच्या मुलांनी व्यायाम करणं अत्यंत गरजेचं

हल्लीच्या मुलांनी व्यायाम करणं अत्यंत गरजेचं

तरुण मुलांनी १२ ते १३ वर्षांपासून व्यायामासाठी सुरुवात केली पाहिजे, असं देशमाने सांगतात. १२ ते १३ वयापासूनच आहार चांगल्या पद्धतीने घेतला पाहिजे. यामुळे येणाऱ्या १८ वर्षापर्यंत तब्येत अतिशय चांगल्या प्रकारे होते. हल्ली मुलांचं खानपान योग्य नसल्यामुळे त्याचा मोठा परिणाम शरीरावर होतो, त्यामुळे आहार चांगला असावा. आहारामध्ये कडधान्य अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्याचा समावेश जेवणात असावा असं ते म्हणाले. हल्लीच्या मुलांनी शंभर टक्के व्यायाम करणं गरजेचं असल्याची बाबही त्यांनी बोलून दाखवली.

मुलांची शिक्षण सुरू, कुटुंबाची परिस्थिती नाजूक

मुलांची शिक्षण सुरू,  कुटुंबाची परिस्थिती नाजूक

देशमाने यांना दोन मुलं एक मुलगी आणि मुलगा आहे. मुलगा बारावीत आहे, तर मुलगी दहावीला आहे. दोघेही शिक्षण घेतात. देशमाने यांच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यांचं स्वतःचं घर देखील नाही. जिमच्या माध्यमातूनच माझं घर चालतं अशी माहिती देशमाने यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed