हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि लगतच्या भागात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यामुळे नागरिकांनी अतिमहत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. १९ जुलैपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून २०-२१ जुलै रोजी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागीय हवामान केंद्रातर्फे पुढील चार दिवसांमध्ये पाऊस कसा राहील यासंदर्भात अंदाज वर्तवला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी पुढील ४ दिवस मुसळधार तर सिंधुदुर्ग व धुळे या जिल्ह्यांच्या काही भागांत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबईच्या विभागीय हवामान केंद्राने केले आहे.
या जिल्ह्यांसाठी अॅलर्ट जारी
– पालघर जिल्ह्याला २१ जुलैपर्यंत येलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, १८ ते २० जुलै दरम्यान ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.
– ठाणे जिल्ह्याला २० जुलैपर्यंत ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर, २१ जुलै रोजी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
– मुंबई आणि लगतच्या भागात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.