• Sat. Sep 21st, 2024

PUNE : खडकवासला ते हडपसर मेट्रोबाबत आली मोठी अपडेट, मार्गाच्या विस्तारातील प्रमुख…

PUNE : खडकवासला ते हडपसर मेट्रोबाबत आली मोठी अपडेट, मार्गाच्या विस्तारातील प्रमुख…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : खडकवासला ते हडपसर या मेट्रो मार्गाच्या प्रकल्प आराखड्यास महापालिकेकडून येत्या आठवडाभरात मंजुरी देण्यात येणार असल्याने मेट्रो विस्तारातील प्रमुख अडसर दूर होणार आहे. महापालिकेच्या निर्णयानंतर राज्य सरकारकडून या आराखड्यास मंजुरी मिळाल्यास या मार्गाचे भवितव्य केंद्र सरकारच्या हाती जाणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या आराखड्यास मंजुरी मिळून भूमिपूजन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
पायाला दुखापत; मात्र जिद्द हरली नाही, १२ वर्षांनंतर ५० वर्षाचा अवलिया देतोय तरुणांना जिमचे धडे
सध्या पुणे शहरात वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर मेट्रो सेवा कार्यरत आहे. गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिकदरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर अंतिम चाचण्या सुरू आहेत. येत्या एक ऑगस्टपासून हा मार्गही नागरिकांना प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मेट्रो प्रकल्पाचा शहरभर विस्तार करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार खडकवासला ते हडपसर ते खराडी या विस्तारित मार्गांसह इतर मार्गांचा विस्तृत प्रकल्प आराखडाही (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. हा आराखडा महापालिकेला सादर झाला असून, त्याला मान्यता मिळणे बाकी आहे.
मेव्हण्याची एक बुक्की पडली भारी, दाजीनं गाठलं थेट पोलीस स्टेशन, नेमकं प्रकरण काय?
मेट्रोच्या खडकवासला ते हडपसर या मार्गावरील विस्तारित आराखड्याला मान्यता देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लवकरच मान्यता दिली जाईल. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळेल, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी सांगितले.

सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर खंडेरायाची मोठी यात्रा; लाखो भक्तांची उपस्थिती

पादचारी मार्गास मंजुरी

शिवाजीनगर येथील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन येथे हिंजवडी-शिवाजीनगर आणि वनाज-रामवाडी हे दोन्ही मार्ग एकत्र येतात. या दोन्ही मार्गांची स्टेशन स्वतंत्र आहेत. त्यामुळे ही दोन्ही स्टेशन एकमेकांना जोडण्यासाठी पादचारी मार्ग उभारला जाणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावाला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुम्टा) मान्यता देण्यात आली. शिवाजीनगर येथे वनाज ते रामवाडी, स्वारगेट ते पिंपरी आणि शिवाजीनगर ते हिंजवडी हे तीन मेट्रो मार्ग एका ठिकाणी येतात. पण यातील दोन मार्गांचे काम महामेट्रोद्वारे, तर हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोचे काम पीएमआरडीएकडून सुरू आहे. महामेट्रो आणि पीएमआरडीएच्या मेट्रो स्टेशनमध्ये सुमारे १६० मीटरचे अंतर आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ जाऊ नये, यासाठी दोन मजले वाढवून ही दोन्ही स्टेशन जोडली जाणार आहेत. यासाठी तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महामेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रो यासाठी निम्मा निम्मा खर्च करणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed