म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : आकर्षक आणि आरामदायी असलेल्या ९०० इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बसगाड्यांपैकी ७०० डबल डेकर एसी बस प्रवाशांच्या सेवेत विलंबानेच दाखल होणार आहेत. बसपुरवठा करणाऱ्या ई कॉसिस कंपनीने ७०० डबल डेकर बस मुदतीत न दिल्याने या कंपनीला काळ्या यादीत टाकल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. त्यामुळे डबल डेकर बससाठी पुन्हा निविदा काढण्यात आली आहे. मात्र या निविदेलाही फक्त एकाच कंपनीने प्रतिसाद दिला असून सध्या या कंपनीसोबत चर्चा सुरू आहे.
बेस्टच्या ताफ्यात नऊशे एसी डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल करणार असल्याचे बेस्ट उपक्रमाने वर्षभरापूर्वी स्पष्ट केले होते. त्यानुसार २०० आणि ७०० डबल डेकर बससाठी निविदा काढण्यात आली. बसपुरवठा करणाऱ्या दोन कंपन्यांनी बस पुरवण्याची तयारी दर्शवली. २०० बसपुरवठा करणाऱ्या कंपनीच्या पहिल्या दुमजली बसला ऑगस्ट २०२२मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. मार्च २०२३पर्यंत एकूण ५० डबल डेकर बस ताफ्यात येणार होत्या. मात्र या कंपनीच्या बसही मुदतीत येऊ शकलेल्या नाहीत. सध्या १२ एसी डबल डेकर बस सेवेत असून त्या दक्षिण मुंबईतील विविध मार्गांवर धावतात. उर्वरित बस डिसेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहेत.
७०० डबल डेकर एसीबसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून बसचा पुरवठा मात्र मुदतीत होऊच शकला नाही. या बस डिसेंबर २०२२पर्यंत येणे अपेक्षित होते. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीस अपेक्षित असणाऱ्या बसही सेवेत दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे पुरवठा करणाऱ्या ई कॉसिस कंपनीस काळ्या यादीत टाकल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी दिली. या बससाठी पुन्हा निविदा काढण्यात आली असून त्याला एकाच कंपनीने प्रतिसाद दिला आहे. प्रतिकिलोमीटरचा खर्च जास्त नमूद करण्यात आल्याने निविदेला प्रतिसाद दिलेल्या कंपनीसोबत सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नव्या एसी सिंगल डेक बस ऑक्टोबरपासून
बेस्ट बसच्या ताफ्यात सध्या ३ हजार ८२ बसगाड्या आहेत. २०२२मध्ये हीच संख्या ३ हजार ६३८ होती. अपुऱ्या बसमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. बसची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सिंघल म्हणाले. गेल्या वर्षी २३ मे रोजी २,१०० ईलेक्ट्रिक सिंगल डेक एसी बस पुरवण्याचे कंत्राट ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला दिले होते. मात्र निविदा प्रक्रियेवरच बोट ठेवून ती अपात्र ठरवण्यासाठी टाटा मोटर्सने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने बेस्टच्या ताफ्यात २,१०० बस येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बस येत्या ऑक्टोबरपासून दाखल होण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले.