जळगाव : जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात वादातून एकान हवेत गोळीबार करून दहशत पसरविल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेने जळगाव हादरले आहे.
जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात दिपक बागुल यांचे काही तरुणांसोबत सोमवारी १७ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास वाद सुरू होता. त्यामुळे या परिसरात मोठा गेांधळ सुरू होता. दरम्यान दिपक बागुल याने हवेत गोळीबार केल्यानंतर या परिसरात दहशत पसरविली.

शिवाजी नगर हुडको परिसरात गोळीबार झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अक्रम शेख आणि प्रीतम पाटील यांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून संशयित आरोपी दिपक बागूल याला ताब्यात घेतले.
संशयित आरोपी दीपक बागुल या पुर्वी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे समोर आले आहे. शहर पोलीस ठाण्यात संशयिताला आणण्यात आले असून उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्यासह पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रफुल्ल धांडे, गजानन बडगुजर, रतन गिते यांनी घटनास्थळाची पाहणी केली. संशयित आरोपी दिपक बागुल याला शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.