• Sat. Sep 21st, 2024
गरोदर मातेला अचानक शेतातच प्रसूतीकळा सुरू, आरोग्य सेविकेच्या तत्परतेने टळला धोका

गडचिरोली: शेतात एका गरोदर मातेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि एकच गोंधळ उडाला. एक तर शेतात रुग्णवाहिका जाऊ शकत नाही, गरोदर माता दुचाकीवर बसण्याच्या परिस्थितीत नाही. या गरोदर मातेला प्रसूतीच्या वेदना अश्या कठीण परिस्थितीत एका कंत्राटी आरोग्य सेविकेने तत्परता दाखवत तिला खाटेवर घेऊन तब्बल एक ते दिड किलोमिटर पायपीट करत तत्काळ प्रसूती करून गरोदर माता आणि तिचे बाळ दोघांचेही जीव धोक्यातून बाहेर काढल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात १४ जुलै रोजी घडली.

सविस्तर वृत्त असे की,राजे अजय गावडे (२२) ही मूळची अहेरी तालुक्यातील पेरमिली जवळील चिन्ना कोरली येथील रहिवासी असून ती ताडगाव येथे आपल्या माहेरी आली होती. ती शेतात काम करत असतानाच तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. तिला वेदना सहन होत नसल्याने ती कसेबसे शेतातच असलेल्या आपल्या घरापर्यंत पोहोचली.

अभिमानास्पद! रजतनगरीच्या इतिहासात नवे ‘सुवर्ण पान’; चांद्रयान- ३ च्या निर्मितीत खामगावचा बहुमूल्य वाटा
याची माहिती ताडगाव प्राथमिक आरोग्य पथक येथे कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्य सेविका सपना भुरसे हिला मिळाली. ती तात्काळ गावाबाहेर जंगलात असलेल्या शेतात जाऊन तिची आरोग्य तपासणी केली असता बळाचा डोकं प्रसूतीसाठी फिक्स झाल्याचे आढळले. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. अन्यथा बाळ आणि मातेचा जीव धोक्यात येणार होता.मात्र,ती दुचाकीवर बसण्याच्या स्थितीत नव्हती.शेतातून दुचाकी चालवणेही कठीण होते. रुग्णवाहिका जाणे शक्य नव्हते.मात्र, माता आणि बाळाला वाचविण्यासाठी कंत्राटी आरोग्य सेविकेने शक्कल लढवत शर्तीचे प्रयत्न करत तत्परता दाखवली.

कठीण परिस्थितीत ती शक्कल लढवत घरच्या लोकांच्या आणि नातेवाईकांच्या मदतीने गरोदर मातेला खाटेवर टाकून तब्बल एक ते दीड किलोमीटर पायपीट करून तिने प्राथमिक आरोग्य पथक गाठले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एम. सातमवाड यांनी तसेच त्यांच्या चमूने गरोदर मातेची सुखरूप प्रसूती केली.१४ जुलै रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास तिची सुखरूप प्रसूती झाली असून मुलगी जन्मली.माता आणि बाळ दोघेही सुखरूप असून त्यांना घरी सोडल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली.

शेअर आहे की पैसे बनवण्याची मशीन, १० हजार रुपयांचे बनवले पाच लाख रुपये, अजूनही दम शिल्लक
विशेष म्हणजे ती दोन दिवस अगोदर त्याच आरोग्य पथक येथे प्रकृती ठीक नसल्याने उपचारासाठी गेली होती.तिच्या तोंडात फोडे झाल्याने तिच्यावर उपचार करून प्रसूतीसाठी दाखल होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते.मात्र,ती प्रसूतीसाठी आपल्या गावाकडे जाणार असल्याचे सांगितले होते. कदाचित ती अगोदरच आरोग्य पथक येथे दाखल झाली असती तर तिला एवढे हाल अपेष्ठा सहन करावे लागले नसते. गरोदरपणात ती आपल्या माहेरी शेतात काम करत होती.

अशा वेळी तिला आणि तिच्या बाळाला धोका निर्माण झाला असता. एका कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्याच्या तत्परते मूळे तिची सुखरूप प्रसूती झाली. भामरागड तालुका हा अतिदुर्गम व आदिवासी बहुल तालुका असून याठिकाणी आरोग्य विभागात बरेच पदे रिक्त असतानाही काही कर्मचारी अगदी तत्परतेने काम करत असल्याची प्रचिती यावरून आली.

मुकेश अंबानींना जगातील सर्वात श्रीमंत महिलेने मागे सारले, जाणून घ्या किती संपत्ती शिल्लक आहे
माहेरघरचा लाभ का घेत नाही

दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात मुख्य रस्ते, नदी नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटत असतो. अशा वेळी गरोदर मातांना बांबूच्या जोळीत किंव्हा खाटेवर घेऊन नदी नाले ओलांडून रुग्णालय गाठावे लागते. अशा वेळी अनेक आदिवासी महिलांना वेळेवर योग्य उपचारा अभावी जीव गमवावे लागले. त्यासाठी या भागात माहेरघर संकल्पना राबविली जात आहे. पावसाळा लागायच्या अगोदरच गरोदर मातांची आरोग्य तपासणी करून त्यांना तालुका मुख्यालयात सुरू असलेल्या माहेर घरी ठेवले जाते. प्रसूती होत पर्यंत त्यांच्या आरोग्याची देखभाल करून प्रसूती झाल्यावर त्यांना सुखरूप घरी पोहोचविले जाते. मात्र असे असतानाही गरोदर माता धोका पत्कारताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed