• Sat. Sep 21st, 2024
मेव्हण्याचं लग्न,स्वस्तात सोनेखरेदीचा मोह भावोजींना महागात पडला, ११ लाखांना गंडा

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : मेव्हण्याच्या लग्नासाठी स्वस्तात सोनेखरेदीचा मोह भावोजींना चांगलाच महागात पडला. बाजारभावापेक्षा कमी दराने कस्टममधून आणलेले सोने देतो सांगून चौघांनी नकली सोन्याची दोन बिस्किटे देऊन तब्बल अकरा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मुलुंडच्या नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कुर्ला येथे खासगी कोचिंग क्लास चालविणाऱ्या रोहन (बदललेले नाव) याचा मित्र ऋषिकेश हा समाजसेवक असून त्याच्या मेव्हुण्याचे लग्न ठरले होते. लग्न दोन तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने ऋषिकेश स्वस्त सोने कुठे मिळेल, याचा शोध घेत होता. हे समजल्यावर रोहनने अजित भंडारे नावाचा व्यक्ती काही दिवसांपूर्वी संपर्कात आला असून तो कस्टम विभागाने पकडलेले सोने स्वस्तामध्ये मिळवून देतो असे सांगितले.
WI vs IND: पहिल्याच कसोटीत टीम इंडियाची डबल सेंचुरी, दोन दिवसातचं वेस्ट इंडिजने टेकले गुडघे
ऋषिकेशने त्याच्याकडून सोने घ्यायची तयारी दाखविली. त्यानंतर रोहन आणि ऋषिकेश अजितला भेटले. बाजारभावापेक्षा कमी म्हणजे प्रति तोळा ५५ हजार रुपये या दराने सोने मिळवून देतो, असे अजितने त्यांना सांगितले. ऋषिकेशने त्याला २० तोळे सोने हवे असल्याचे सांगितले. त्यानुसार अजितने त्याच्या परिचयातील काही लोकांशी संपर्क साधला आणि त्यांना या व्यवहाराबद्दल सांगितले. त्यांनी सोन्याचे पैसे रोख आणि एकरकमी द्यावे लागतील, असे सांगितले. मुलुंड पूर्वेकडील विहार हॉटेलजवळ पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार रोहन आणि ऋषिकेश ११ लाख रुपये बॅगमध्ये भरून तेथे आले. तेथे आलेल्या दोघांनी ते पैसे घेऊन त्यांना सोन्याची दोन बिस्किटे दिली.

आजचा दिवस भारतीयांसाठी महत्वाचा; ‘चांद्रयान-३’ झेपावणारं, उत्सुकता शिगेला
अचानक पळापळ आणि पश्चाताप

सर्व घेवाणदेवाण झाल्यानंतर सर्व जण रस्त्याने चालत असताना अचानकपणे त्यांच्या बाजूला एक इनोव्हा कार येऊन थांबली. जणू काही पोलिसांचा छापा पडला आहे, अशाप्रकारे अजितने ओरडून सर्वांना पळून जाण्याचा इशारा केला. त्यावेळी सोने देण्यासाठी आलेला एक तरुण जबरदस्ती करतात त्या पद्धतीने कारमध्ये बसला आणि पसार झाला. मात्र हा छापा नसून बनाव रचल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे राहुल याच्या लक्षात आले आणि त्याने नवघर पोलिस ठाण्यात तक्रार केली.
Maharashtra Politics: खातेवाटपाचं ठरलं आता खाती बदलणार, शिंदेंसह भाजपकडील कोणती खाती अजित पवारांकडे? यादी समोर

कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांची सोन्याची दिवाळी; कोटींची उलाढाल, सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed