• Sat. Sep 21st, 2024

मुंबईकरांचे Mhada च्या ४ हजार घरांसाठी दीड लाख अर्ज,ऑनलाइन सोडत कधी? नवी अपडेट समोर

मुंबईकरांचे Mhada च्या ४ हजार घरांसाठी दीड लाख अर्ज,ऑनलाइन सोडत कधी? नवी अपडेट समोर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सर्वसामान्यांच्या आवाक्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या घरांच्या सोडतीस विक्रमी प्रतिसाद लाभला आहे. म्हाडाने यंदा ४,०८२ घरांसाठी जाहीर केलेल्या ऑनलाइन सोडतीसाठी १ लाख ४५ हजार ८४९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी १ लाख १९ हजार २७८ अर्जदारांनी अनामत रक्कम भरुन सोडतीतील सहभाग निश्चित केला आहे.

मुंबई महानगरातील घरांच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्यांचे डोळे म्हाडाच्या घरांच्या सोडतीकडे लागलेले असते. यंदाच्या वर्षात म्हाडाने ४,०८२ घरांसाठी ऑनलाइन सोडत जाहीर केली. त्यासाठी म्हाडाने अर्ज सादर करण्यासाठी ११ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. ती मुदत ११ जुलै रोजी सायंकाळी संपुष्टात आली. सोडतीमधील अत्यल्प उत्पन्न गटात पहाडी गोरेगाव पश्चिमेसह अॅन्टॉप हिल, विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचा समावेश आहे.
बेस्टच्या प्रीमियम AC बसला मुंबईकरांनी आपलं मानलं, सहा महिन्यात तीन लाख प्रवाशांचा प्रतिसाद,तिजोरी मालामाल
अल्प उत्पन्न गटासाठी पहाडी गोरेगाव, लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल, सिद्धार्थनगर- गोरेगाव, डीएन नगर-अंधेरी, पंतनगर-घाटकोपर, कन्नमवार नगर-विक्रोळी, चारकोप-कांदिवली, महावीर नगर-कांदिवली, जुने मागाठाणे-बोरिवली, गव्हाणपाडा-मुलुंड, पीएमजीपी-मानखुर्द, मालवणी-मालाड आदींमधील घरांचा समावेश आहे. उन्नतनगर-गोरेगाव पश्चिम, महावीर नगर- कांदिवली, जुहू, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, सहकार नगर-चेंबूर, लोकमान्य नगर-दादर, अँटॉप हिल-वडाळा, भायखळा, टिळकनगर-चेंबूर, चांदिवली-पवई, गायकवाड नगर-मालाड, प्रतीक्षा नगर -सायन, चारकोप कांदिवली येथे मध्यम उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. उच्च उत्पन्न मध्ये जुहू -अंधेरी पश्चिम, वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, शिंपोली कांदिवली, तुंगा पवई, चारकोप कांदिवली, सायन पूर्वचा समावेश आहे.
यशस्वी जैस्वालने पहिल्याच शतकासह रचला इतिहास, आतापर्यंत एकाही खेळाडूला ही गोष्ट जमली नाही

प्रारूप यादी १७ जुलै रोजी

म्हाडातर्फे १७ जुलै रोजी दुपारी तीन वाजता वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.inसंकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. १९ जुलै दुपारी ३ पर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येतील. त्यानंतर २४ जुलै रोजी दुपारी तीन वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
Maharashtra Politics: खातेवाटपाचं ठरलं आता खाती बदलणार, शिंदेंसह भाजपकडील कोणती खाती अजित पवारांकडे? यादी समोर

कोकणातील चिपळूण येथील सवतसडा धबधबा बनतोय पर्यटकांचं आकर्षण; नागरिकांची मोठी गर्दी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed