• Sat. Sep 21st, 2024

पद्मसिंह पाटील दुरावले, पण भाच्याने राष्ट्रवादीची पताका फडकवत ठेवली

पद्मसिंह पाटील दुरावले, पण भाच्याने राष्ट्रवादीची पताका फडकवत ठेवली

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसला २०१९ मध्ये गळती लागल्याने पक्षाला घरघर लागली. स्थापनेपासून सोबत असलेले निष्ठावंत नेतेही दुरावले. एवढंच काय तर शरद पवारांचे नातेवाईकही राष्ट्रवादी सोडून गेले. ज्यामध्ये पद्मसिंह पाटलांचं नाव येतं. पद्मसिंह पाटील भाजपमध्ये गेले. पण त्यांचे नातेवाईक आजही पवारांशी एकनिष्ठ आहेत, ते म्हणजे राहुल मोटे.

संकटकाळात राणा पाटलांनी पवारांची साथ सोडली. मात्र पद्मसिंह पाटलांचे भाचे अजितदादांच्या बंडानंतर पवारांशी आजही एकनिष्ठ आहेत. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानं राष्ट्रवादीला जबर हादरा बसलाय. अशा परिस्थितीत राहुल मोटे धाराशिवमध्ये राष्ट्रवादीची खिंड लढवताना दिसतात. त्यांनी पवारांशी निष्ठा कायम ठेवली आहे.

महारूद्र मोटे हे काँग्रेसचे आमदार होते. वडिलांचा वारसा घेऊन राहुल मोटे राजकारणात आले. त्यानंतर मामा पद्मसिंह पाटलांनी त्यांना वडिलकीचा आधार दिला.

Devendra Fadnavis: मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? पत्रकारांचा थेट प्रश्न, देवेंद्र फडणवीस हसले आणि म्हणाले…
> १९९६ ला वडिलांच्या जाण्यानंतर राहुल मोटे राजकारणात
> १९९९ ला भूम-परांडामधून विधानसभा लढवण्यासाठी समर्थकांची मागणी, पण वय कमी पडलं
> २००४ ला राष्ट्रवादीकडून उमेदवारी, पहिल्याच प्रयत्नात विजयी
> २००९ ला विजयाची पुनरावृत्ती
> २०१४ ला मोदी लाटेतही जागा राखली
मात्र २०१९ ला तानाजी सावंतांनी पराभव केला

वडिलांच्या निधनानंतर राहुल मोटेंना पद्मसिंह पाटलांनी ताकद दिली आणि आमदार केलं. २०१९ ला पद्मसिंह पाटील घराण्याने भाजपत प्रवेश केला. मात्र मोटे राष्ट्रवादीतच राहिले.
संचालकांच्या अपहरणनाट्याची राज्यभर चर्चा, तानाजी सावंतांना मविआचा झटका, ठाकरेंनी होमग्राऊंडवर पॉवर दाखवली
> शरद पवारांनी पद्मसिंह पाटलांच्या पुढच्या पिढीचंही राजकारण घडवलं
> राहुल मोटेंसोबत आमदार झालेल्या राणा पाटलांना मंत्री पद दिलं
> २०१९ ला राणा पाटलांना लोकसभेची उमेदवारी दिली, तरीही राणा पाटील शरद पवारांपासून दुरावले
> अजितदादांच्या बंडानंतरही राहुल मोटे निष्ठावंत
> राष्ट्रवादीतील फुटीनंतर मेळावा घेत पवारांसोबत असल्याची भूमिका जाहीर

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अनेक माजी आमदारांनीही अजितदादांना साथ दिली. पण राहुल मोटेंनी पक्षासोबत कायम असल्याचं सांगितलं. एकीकडे राणा पाटील भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक असताना राहुल मोटेंनी शरद पवारांना पाठिंबा दिला असल्याने त्यांच्या आगामी भूमिकेकडे लक्ष असेल. जर राणा पाटलांनी भाजपकडून लोकसभा लढवली, तर राहुल मोटे भावाला मदत करतील की आघाडी धर्म पाळून ओमराजेंना मदत करतील? हे ही पाहावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed