• Mon. Mar 9th, 2026

    शरद पवार की अजित पवार निर्णय वेटिंगवर, सरोज अहिरेंचा राजकीय संघर्ष सुरु पण कुणाविरोधात?

    शरद पवार की अजित पवार निर्णय वेटिंगवर, सरोज अहिरेंचा राजकीय संघर्ष सुरु पण कुणाविरोधात?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. अहिरराव या देवळाली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने त्यांनी सामाजिक कार्यातून मतदारांशी सुरू केलेला संपर्क आ. अहिरे यांना खटकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राजकीय वजन वाढलेल्या अहिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अहिररावांना पुन्हा काटशह देण्याचा प्रयत्न केला.

    आ. अहिरे आणि डॉ. अहिरराव यांच्यातील संघर्ष २०१९ पासून सुरू आहे. डॉ. अहिरराव यांनी मतदारसंघात जोरदार कामे सुरू केली होती. रेशनकार्ड वाटप, दाखले वाटप यांच्यासह शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. परंतु, २०१९ च्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली. मात्र, निवडणुकीनतंर त्या पुन्हा सक्रिय झाल्या. प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना मतदारसंघातील जनसंपर्कावरून आ. अहिरेंनी त्यांची तक्रार थेट महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली होती. महसूल मंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जानेवारीत त्यांना नोटीसही बजावली होती. परंतु, डॉ. अहिरराव यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही छुपे बळ उभे केले. त्यामुळे हा वाद अंशत: शांत झाला. परंतु, अहिरराव यांनी त्यांच्या ओजस्वी फाउंडेशनच्या माध्यमातून बचतगट प्रशिक्षण आणि व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे मतदारसंघात आयोजन केले. ते अहिरे यांना खटकले आहे. त्यांनी याबाबत थेट तक्रार केली नसली तरी, जिल्हाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अहिरराव यांना पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.
    Maharashtra Weather Today : राज्यात आज पावसाचा लपंडाव, मुंबई, पुणे कोरडं तर ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट

    अहिरेंच्या तक्रारींना आले वजन

    आ. अहिरे यांनीही तहसीलदार अहिरराव यांच्याबाबत तसेच त्यांची बहीण अलका अहिरराव यांच्याबाबत जिल्हाधिकऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. परंतु, आता आ. अहिरेंच्या तक्रारींना राजकीय वजन प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर आ. अहिरे यांनी अजित पवार गट आणि शरद पवार गटापासून अंतर राखले आहे. परंतु, या राजकीय घडामोडीत त्यांच्या शब्दाला महत्त्व आले आहे. त्यामुळे व्हॉटसअपवरील मॅसेजच्या अनुषंगांने जिल्हा प्रशासनाने त्यांना नोटीस बजावल्याचे चित्र आहे.
    ‘यशस्वी’ कामगिरी! मैदानावर पाऊल ठेवताच थेट सचिनचा विक्रम मोडला, शुभमन गिलही पडला मागे
    महिला बचत गटांची कार्यशाळा हा राजकीय कार्यक्रम, तसेच शासनाच्या ध्येयधोरणाविरुद्ध नाही. केवळ गरजूंसाठी मदत हा शुद्ध हेतू ठेवूनच ओजस्वी फाउंडेशन हा कार्यक्रम घेत आहे, असं नाशिकच्या तहसलीदार डॉ. राजश्री अहिरराव यांनी सांगितलं.

    निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती, अब्दुल सत्तारांवर खटला चालवण्याचे आदेश, मंत्रिपदावरुन उचलबांगडी?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed