हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच १३ जुलै रोजी पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण विभागात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमानामध्ये वाढ जाणवू लागली असून, मुंबईत आठवड्याची सुरुवात उकाड्याने झाल्याची भावना मुंबईकरांनी व्यक्त केली.
या १६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता…
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सिंधुदूर्ग, नाशिक, औरंगाबाद, जालना, धुळे, जळगाव, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या ११ जिल्ह्यांना आज१३ जुलै रोजी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात ला आहे. शनिवार, १५ जुलैपर्यंत आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची तसेच सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. १६ व १७ जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील तसेच २२ जुलैपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईत मान्सूनच्या सुरुवातील चांगला पाऊस झाला होता. पण आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहे. पुढचे काही दिवस मुंबईत पावसाचा जोर नसणार आहे. तर शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी बरसतील, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.