• Sat. Sep 21st, 2024

महिन्याभरातच दुसरा दौरा, मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिगत लक्ष घालण्यासारखं कोल्हापुरात आहे तरी काय?

महिन्याभरातच दुसरा दौरा, मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिगत लक्ष घालण्यासारखं कोल्हापुरात आहे तरी काय?

कोल्हापूर : शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १४ जुलैला म्हणजे येत्या शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महिनाभरातच हा दुसरा कोल्हापूर दौरा होत आहे. यामुळे शिवसैनिक आतापासूनच तयारीला लागले आहेत. शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पेटाळा मैदानात १४ तारखेला दुपारी ४ वाजता शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना आणि शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
ईडीमुळे बंड? पवारांची साथ सोडली? कोल्हापुरात येताच मुश्रीफांनी दिली सगळ्याच प्रश्नांची उत्तरं
काय म्हटल आहे पत्रकात?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोल्हापूरवासियांचे जिव्हाळ्याचे नाते होते. शिवसेनाप्रमुखांनी कोल्हापूरवासीयांवर विशेष प्रेम केले आणि कोल्हापूरवासियांनी अपवाद वगळता नेहमीच शिवसेनेच्या उमेदवारांना साथ देवून शिवसेनाप्रमुखांच्या प्रती आपले प्रेम दाखवून दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नेहमीच आई अंबाबाई देवीच्या दर्शनाने करायचे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वसा पुढे नेणारे शिवसेनेचे मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही कोल्हापूरवर व्यक्तिगत लक्ष आहे. गेल्या वर्षभरात कोट्यावधी रुपयांचा निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे.
४६ वर्षांनंतर पहिल्यांदाच मंदिर आले पूर्णपणे पाण्याबाहेर, दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी
गेल्या महिन्यातच १३ जून रोजी शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत तपोवन मैदान येथे भव्य सभा पार पडली. त्यानंतर लगेचच येत्या १४ तारखेला ते शिवसैनिकांचा मेळावा घेवून शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यास शिवसेनेचे विविध मंत्री, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या लाडक्या नेतृत्वाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी शिवसैनिक सज्ज असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी पत्रकात म्हटले आहे.

मोदीच पुन्हा पंतप्रधान हवेत, राष्ट्रवादी म्हणून आमचा पूर्ण पाठिंबा; मुश्रीफाचं समरजीतसिंह घाटगेंना प्रत्युत्तर

पदाधिकाऱ्यांची शाहू स्मारक भवन येथे बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या अनुषंगाने उद्या बुधवारी १२ तारखेला सकाळी ११.०० वाजता ‘राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर’ येथे खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गट मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed