• Mon. Nov 25th, 2024
    मेंढपाळाच्या डोळ्यासमोरच वाहनाने १०० हून अधिक शेळ्यांना चिरडले; अंगावर काटा आणणारे दृश्य

    नागपूर: नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील मौदाजवळ अज्ञात वाहनाने १०० हून अधिक शेळ्या चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी टी-पॉइंटजवळ घडली. गुजरात राज्यातून मेंढ्यांचे मोठे कळप उन्हाळ्यात नागपूर जिल्ह्यात येतात. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पळून गेले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
    शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर; ४४३ शाळांचा वीज पुरवठा खंडित, मुलांचे शिक्षण अंधारात
    मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सध्या पेरणीला सुरुवात झाली आहे. या कारणास्तव हा शेळ्यांचा कळप राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ नागपूर भंडारा रस्त्यावरून जात होता. त्यानंतर मौदा टी-पॉइंट येथे अज्ञात वाहनाने १०० हून अधिक शेळ्या-मेंढ्यांना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच मेंढ्यांचे मांस आणि रक्ताचा अक्षरशः सडा पडला होता. रस्त्यातच मेंढ्या मृतावस्थेत पडल्या होत्या. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा तपास सुरू केला.

    ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे मेंढ्या चिरडल्याचा आरोप केला आहे. आरोपी ट्रक चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी मेंढपाळाने केली आहे. या अपघातानंतर मेंढ्यांचे मृतदेह महामार्गावर १०० ते १५० मीटरपर्यंत पडून होते. विशेष म्हणजे मेंढ्यांवर वाहने जाण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी ९ नोव्हेंबर २०२१ रोजी एका वेगवान ट्रकने रस्त्यावरून जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाला चिरडले होते. यात १०२ मेंढ्या मरण पावल्या तर ४० मेंढ्या जखमी झाल्या होत्या.

    ८५० शेळ्या-बोकड; लाखोंचं टर्नओव्हर; शेतकऱ्याचं थक्क करणारं ‘वैभव

    अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी रस्त्यावर पत्रवाडा येथून ६ किमी अंतरावर अंजनगावकडे जाणाऱ्या सुमारे दीडशे मेंढ्यांच्या कळपाला भरधाव ट्रकने धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये मेंढीपालन करणाऱ्या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हा मेंढपाळ राजस्थानचा रहिवासी होता. पत्रवाडा येथून ते अंजनगावकडे जात असताना एका ट्रकने त्यांच्या मेंढ्यांना चिरडले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *