स्थानिकांच्या दिलेल्या माहितीनुसार, सचिन शिंदे हा गेले ५ दिवस बेपत्ता होता. तो ५ दिवस कुठे होता? त्याने घरच्यांसोबत संपर्क का केला नाही ? अचानक तो कुठे गायब झाला? नदीत मृतावस्थेत कसा काय सापडला ? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं मोठं आव्हान उरण पोलिसांसमोर होतं. वर्षभरापूर्वी सचिन शिंदे याचं लग्न झालं होतं. मात्र त्याची पत्नी मुंबई येथे वास्तव्य असते. तो ज्या दिवशी घरातून बाहेर पडला त्या दिवशी आपल्याकडील पॉकेट व सगळं साहित्य घरीच ठेवून निघाला होता, अशी माहिती रोहा पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.
सचिन दिनांक ४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेला होता. त्याची मिसिंग तक्रार त्याच्या वडिलांनी ५ जुलै रोजी नोंदवली होती. रोहा पोलिस आणि त्याच्या नातेवाईकांकडून ५ दिवस सचिनचा कसून शोध सुरु होता. मात्र १० जुलै रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक करंजवाडी डोंगरी येथील कुंडलिका नदीच्या खाडीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळला.
रोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. मात्र सचिनने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याबाबत कोणताही कयास घटनास्थळावरून पोलिसांना बांधता आला नाही. त्यामुळे या गूढ प्रकारणाचा कसून शोध रोहा पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर आणि टीम या सगळ्याचा तपास करत होते. आता या सगळ्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालानंतर मोठी माहिती समोर आली आहे. अधिक तपास रोहा तालुक्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर करत आहेत.
दुसरीकडे उरण तालुक्यात सोमवारी (१० जुलै) एका महिलेचा गळा कापलेला मृतदेह बेवारस स्थितीत चिरनेरच्या रस्त्यावर सापडला. अज्ञात महिलेबाबत कोणतीच माहिती अथवा प्रकरणाचा खुलासा झालेला नसतानाच इकडे रायगड जिल्ह्यातल्या रोह्याच्या नव्या घटनेने तालुका हादरला आहे.