• Mon. Nov 25th, 2024

    लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! फटका गँग पुन्हा सक्रिय, चर्चगेट स्थानकातील ताजी घटना

    लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! फटका गँग पुन्हा सक्रिय, चर्चगेट स्थानकातील ताजी घटना

    मुंबई : लोकलच्या दरवाज्यावर उभे राहिलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून चोरी करण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. अशा फटका पद्धतीचा वापर करून लॅपटॉप बॅगची चोरी केल्याची घटना समोर आली आहे.

    काय प्रकरण?

    चर्चगेट स्थानकातून रात्रीच्या वेळी रविकांत पाल यांनी बोरिवली लोकल पकडली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्यांना डब्यात प्रवेश करण्यास संधी मिळाली नाही. यामुळे दरवाज्यावरच उभे राहून ते प्रवास करत होते. प्रवास सुरू असतानाच प्रभादेवी ते दादर दरम्यान जोरदार फटका लगावत त्यांची बॅग चोरण्यात आली. फटक्याच्या हल्ल्यामुळे रविकांत किरकोळ जखमी झाले. दुसऱ्या दिवशी पाल यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाणे गाठले आणि घडलेली हकीकत कथन केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा तपास सुरू केला आहे.

    झाडाची काठी, लोखंडी किंवा लाकडी पट्टीच्या मदतीने दरवाज्यात उभे असलेल्या प्रवाशांवर हल्ला करणे, त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरणे या प्रकाराची प्रवाशांमध्ये फटका हल्याची दहशत होती. मात्र रेल्वे स्थानकादरम्यान गस्त पथक नेमणे, संवदेनशील ठिकाणी जनजागृती आणि आरोपींवर कारवाई यांमुळे अशा घटना बंद झाल्या होत्या. लोकल वेगात असल्याने अचानक झालेल्या फटका हल्यात प्रवाशांचा जीव जाण्यााची शक्यता अधिक असते. केवळ पश्चिम रेल्वेवर नव्हे तर मध्य आणि हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गवरील अनेक स्थानका दरम्यान घटना घडतात. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
    अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी साधली संधी; पंजाब मेल एक्सप्रेसमध्ये चढले अन्…,प्रवाशांनी सांगितली आपबीती

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed