• Sat. Sep 21st, 2024
मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांनाही दाखवले काळे झेंडे, धुळ्यात काय घडलं?

धुळे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळे दौऱ्यावर आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान, मुख्यमंत्री धुळ्याला पोहोचले पण तरी त्यांचं विमान तिथे लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना धुळ्याहून जळगाव विमानतळावर जावं लागलं. तिथून ते रस्ते मार्गाने धुळ्याच्या दिशेला रवाना झाले. मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा धुळ्याच्या दिशेला जात असताना फागणे गावाजवळ भूषण पाटील नामक व्यक्ताने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. त्यामुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे शहरात नऊ ते दहा महिन्यांपूर्वी अविनाश परदेशी या भूषण पाटील यांच्या मित्राचा काही गुंडांनी एकत्रित येऊन खून केला होता. अद्याप पर्यंत या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली का नाही असा प्रश्न विचारत धुळे शहरातील भूषण पाटील काही दिवसांपूर्वी मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

कारखान्यात स्फोट झाला, मुख्यमंत्र्यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली, पण हातात दिले अवघे एक लाख रुपये!

मुख्यमंत्री शिंदे हे धुळे दौऱ्यावर येतील त्यावेळेस त्यांना काळे झेंडे दाखवणार असा इशारा देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर भूषण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत शासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध केला. फागणे गावात घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ पोलिसांची दाणादाण उडाली. अचानक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून शासनाविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भूषण पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

काळे झेडें दाखवणाऱ्या भूषण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जोपर्यंत अविनाश परदेशी याच्या मुख्य मारेकऱ्यांना पोलीस ताब्यात घेत नाहीत आणि तसेच गुडांच्या धमक्यांपासून मला पोलीस संरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझे आंदोलन असेच सुरू असेल. तसेच येणाऱ्या काळात पावसाळी अधिवेशनादरम्यान मी माझ्या संपूर्ण कुटुंबासह यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा गंभीर इशारा देखील भूषण पाटील यांनी यावेळेस दिला आहे.

नदीकाठी फिरायला गेले, दोघांनी उडी मारली, २४ तासानंतर मुलं मृतावस्थेत सापडली; कुटुंबियांचा हंबरडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed