• Sat. Sep 21st, 2024

भुजबळांच्या मतदारसंघात धडकी भरवणारी सभा, आता नाशिक काबीज करण्यासाठी शरद पवारांची नवी रणनीती

भुजबळांच्या मतदारसंघात धडकी भरवणारी सभा, आता नाशिक काबीज करण्यासाठी शरद पवारांची नवी रणनीती

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर नाशिक दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांना इगतपुरी ते येवल्यापर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर पवारांनी जिल्ह्यात नव्या जोमाने पक्षबांधणीला प्रारंभ केला आहे. ग्रामीणमध्ये जनाधार दिसत असला, तरी नाशिक शहरात आगामी महापालिका आणि विधानसभेच्या दृष्टीने संघटन बांधणीवर काम करावे लागणार आहे. त्यामुळे नाशिकच्या पदाधिकाऱ्यांशी ‘वन टू वन’ चर्चा करीत नवीन ‘टीम’ बांधणीला त्यांनी वेग दिला असून, नाशिक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दत्तात्रय माळोदे आणि माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे आदींशी पवारांशी याबाबत चर्चा केली.

Rohit Pawar: विधानसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवारांविरोधात कोण उतरणार, रोहित पवार स्पष्टच म्हणाले….

नाशिक जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. ‘पुलोद’च्या प्रयोगादरम्यान जिल्ह्यातून एकाच वेळी १४ आमदारांची साथ मिळाली होती. सद्यस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. परंतु, अजित पवार यांच्या बंडानंतर छगन भुजबळांसह जिल्ह्यातील पाच आमदारांनी अजित पवारांना साथ दिली आहे. आमदार सरोज अहिरे यांनी तूर्तास तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. ग्रामीणमध्ये जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्यासह शहरातून गजाजन शेलार हे शरद पवारांच्या सोबत राहिले आहेत. त्यामुळे भुजबळांचे बंड जिव्हारी लागल्यानंतर शरद पवार गेल्या शनिवारी नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. पवारांचा हा दौरा चांगलाच यशस्वी झाला असून, इगतपुरी ते येवल्यापर्यंत त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. एवढेच नव्हे, तर येवल्यातील सभेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे शरद पवारांनी नाशिकमधूनच पक्ष उभारणीला वेग दिला असून, दौरा आटोपताच त्यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसोबत ‘वन टू वन’ चर्चा सुरू केली आहे. गजानन शेलार यांनी शहराध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीने, तसेच शहरातील चार विधानसभानिहाय पक्षबांधणीला जोर दिला आहे. भुजबळांमुळे शहरातील पदाधिकारी अजित पवार गटासोबत गेले असले, तरी नव्याने पक्ष उभारून निवडणुका लढण्याची रणनीती त्यांनी आखण्यास सुरुवात केली आहे.

Ajit Pawar: अजितदादांनी मंत्रालयातील केबिन नं. ६०२ नाकारल्याची चर्चा, ‘शापित’ दालनामागे कुठली कुजबूज?

पदाधिकाऱ्यांशी मुंबईत चर्चा

पवार यांनी रविवारी नाशिकमध्ये कोंडाजीमामा आव्हाड आणि शेलार यांच्याशी चर्चा केल्यानंतर सोमवारी (दि. १०) पवारांनी नाशिक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दत्तात्रय माळोदे, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे यांना मुंबईला बोलवून घेत शहरातील स्थितीचा आढावा घेतला. शहरात नव्या ‘टीम’ची बांधणी करणे आवश्यक असल्याचे सांगत प्रभागनिहाय आणि विधानसभानिहाय प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यासंदर्भात चर्चा केली. ग्रामीणमध्ये ताकद मोठी असली, तरी शहरातही पक्षाची ताकद वाढविण्याचे निर्देश पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

सात वेळा आमदार, अनेकदा मंत्री, तरीही अजितदादांना साथ, आता पवारांचाच विश्वासू वळसे पाटलांविरोधात शड्डू ठोकणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed