• Sun. Sep 22nd, 2024

अजितदादा हे उगवते सूर्य, शरद पवारांना धक्का देत नाशिक जिल्ह्यातील आमदाराने जाहीर केली भूमिका

अजितदादा हे उगवते सूर्य, शरद पवारांना धक्का देत नाशिक जिल्ह्यातील आमदाराने जाहीर केली भूमिका

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नाशिकमधील राष्ट्रवादीचे आणि ओबोसींचे बडे नेते छगन भुजबळ हे अजित पवारांसोबत गेल्यानंतर आता नाशिकमधील आणखी एका आमदाराने शरद पवार यांना धक्का दिला आहे. नाशिकमधील सिन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी अजितदादांना पाठिंबा जाहीर केला आहे.

माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरमध्ये मेळावा घेत अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अजित पवार यांना पाठिंबा जाहीर करताना माणिकराव कोकाटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण विकासाच्या मुद्द्यावर अजितदादांना पाठिंबा देत असल्याचं कोकाटे यांनी म्हटलं आहे.
आधी सुप्रिया सुळे, आत्ता भुजबळ सरोज अहिरेंच्या भेटीला; आमदाराच्या पाठिंब्यासाठी दोन्ही गटांचा आटापिटा
मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्यांवर अजितदादांना आपण पाठिंबा दिला आहे. पवार साहेब यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. पण अजितदादा हे उगवते सूर्य आहे. शरद पवार साहेब आता फक्त दौरे करत आहेत. पण निवडणूक ते कसे लढवतात यावर सर्वकाही अवलंबून आहे. पण सध्या किती परिणाम होईल, हे सांगता येत नाही, असं कोकाटे म्हणाले. माणिकराव कोकाटे यांनी यावेळी आणखी एक मोठा दावा केला आहे. प्रतिज्ञापत्र लिहून देताना सरकारसोबत जायचे आहे, हे सर्व आमदारांना माहिती होते, असं मोठं वक्तव्य कोकाटे यांनी केलं आहे.
पवार किती माफी मागणार? पक्ष फुटण्याची सुरुवात त्यांच्या घरातूनच, भुजबळांचे प्रत्युत्तर
सध्या अजितदादांसोबत ४२ आमदार आहेत. तसेच अजून ७ ते ८ आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. यामुळे अजितदादांसोबत ५० आमदार येतील असा अंदाज माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला आहे. यामुळे शरद पवार यांना पुढील काळात आणखी धक्के बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मी १९८५ पहिल्यांदा आमदार झालो, त्यानंतर ४ महिन्यांनी रोहित पवारांचा जन्म; छगन भुजबळांचा घणाघात

छगन भुजबळ सरोज अहिरेंना भेटले

नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचंही मन वळण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजित पवार यांचे समर्थक आणि मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी त्यांची भेट घेतली होती. सरोज अहिरे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री भुजबळ यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यापूर्वी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेही सरोज अहिरे यांना भेटल्या होत्या. पण सरोज अहिरे यांनी आद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्या कुणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed