• Sat. Sep 21st, 2024

आमची ऐंशी उलटल्यावर तूही असंच करशील का? अजितदादांच्या बंडानंतर रोहित पवारांचे आई-बाबा चिंतातुर

आमची ऐंशी उलटल्यावर तूही असंच करशील का? अजितदादांच्या बंडानंतर रोहित पवारांचे आई-बाबा चिंतातुर

मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आणि कुटुंब कोणी फोडलं, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. लोकं ही गोष्ट विसरणार नाहीत. आमची लढाई ही भूमिकेची, अस्मितेची आणि स्वाभिमानाची आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी केले. ते सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी त्यांच्या घरात घडलेला एक किस्सा सांगितला. आम्ही वयस्कर होऊ, ऐंशीच्या पुढे जाऊ तेव्हा तू सुद्धा अशीच भूमिका घेशील का, असा प्रश्न त्यांनी मला विचारला. माझ्या आई-वडिलांना हा प्रश्न पडला असेल तर सामान्य कुटुंबातील आई-वडिलांना काय प्रश्न पडत असतील? महाराष्ट्रातील तमाम जनेतला प्रश्न पडले आहेत. आपल्या कुटुंबावर अशी परिस्थिती आहे, तेव्हा आपण काय करणार, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. जनता या सगळ्या गोष्टी व्यक्तिगत घेत आहे. भाजपने केलेल्या गोष्टी जनतेला पेटलेल्या नाहीत, असे रोहित पवार यांनी म्हटले.

शरद पवारांना ‘सैतान’ म्हणणाऱ्या सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी झापलं, म्हणाल्या, ‘कुवत बघून बोला’

भाजपने खूप योग्य पद्धतीने डाव खेळला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता जपण्यासाठी निर्माण केलेली शिवसेना फोडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. देशभरात भाजपच्या विरोधात वातावरण आहे. त्याच्यावर कोणी काही बोलू नये, मोठे नेते गुंतून राहावेत, यासाठी भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडली. जेणेकरून आमच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु राहतील, असे रोहित पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अजितदादा गटातील आमदार दिलीप वळसे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. माझं वय ३७ असलं तरी त्यांचा राजकीय अनुभव ४० वर्षांचा आहे. मला या गोष्टीचा आदर आहे. त्यांना पवार साहेबांसोबत असताना पदं मिळाली की नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ४० वर्षे पवारांसोबत राहून तरी सुद्धा पवारांची भूमिका कळाली नसेल, विचारसरणी कळाली नसेल, तर यामध्ये कसा चुकीचा, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.

किरण लहामटेंनी फोन बंद केला, अज्ञातस्थळी रवाना झाले पण अजित पवारांच्या माणसांनी गाठलंच, अखेर मोठा निर्णय

अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न: रोहित पवार

नाशिकमध्ये पोस्टर्सवर अजित पवार यांचा फोटो नव्हता. भुजबळ साहेब बोलत असताना त्यांना सहजपणे बाजूला काढलं. छगन भुजबळांनी सगळं खापर अजित पवार यांच्यावर फोडले. चार ते पाच लोक अजित पवार यांना व्हिलन ठरवत आहेत. लोकांना अजित पवारांचा निर्णय पटलेला नाही. भाजप एसी खोलीत बसून या सगळ्याची मजा बघत आहे. आम्ही आमच्यात भांडतोय, असे रोहित पवार यांनी म्हटले.

माझा अंदाज चुकला, माफी मागतो; येवल्यात पुन्हा येईन; पवारांनी दंड थोपटले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed