• Mon. Nov 25th, 2024

    आई-बाबा मंदिरात दर्शन घेऊन आरती करत होते, बाहेर ६ वर्षीय कोवळ्या जीवावर काळाची झडप!

    आई-बाबा मंदिरात दर्शन घेऊन आरती करत होते, बाहेर ६ वर्षीय कोवळ्या जीवावर काळाची झडप!

    जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरात श्री गणपती विसर्जनासाठी नगर परिषदेने एक हौद तयार करून ठेलेला आहे. या पाण्याच्या हौदामध्ये पडून ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे .उदयन भाऊसाहेब लहाने असं मृत चिमुकल्याचे नाव असून ही हृदयद्राक घटना काल रविवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली आहे.

    याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, जालना पोलीस खात्यात कार्यरत असलेले भाऊसाहेब लहाने यांचा उदयन हा मुलगा आहे. लहाने कुटुंबीय भोकरदन शहरातील स्वामी समर्थ केंद्रात दर्शनासाठी गेले होते. भाऊसाहेब लहाने व त्यांच्या पत्नी मंदिरात दर्शन घेऊन आरती करीत असताना त्यांची मुले उदयन आणि विराज हे बाहेर मोकळ्या जागेत खेळत होती. ही दोन्ही मुले खेळता-खेळता नगर परिषदेने गणपती विसर्जनासाठी तयार केलेल्या हौदाजवळ गेली. त्यानंतर सदर हौदात बुडून उदयनचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    शरद पवारांना ‘सैतान’ म्हणणाऱ्या सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी झापलं, म्हणाल्या, ‘कुवत बघून बोला’

    उदयन हौदात बुडल्याचे कळताच नागरिकांनी धावपळ करून उदयनला बाहेर काढले. पण उदयनचा प्राण वाचविण्यात त्यांना यश आले नाही.

    कोकणातील चिपळूण येथील सवतसडा धबधबा बनतोय पर्यटकांचं आकर्षण; नागरिकांची मोठी गर्दी

    दरम्यान, लहाने कुटुंबीयांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. या घटनेमुळे भोकरदन शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed