कोल्हापूर : आईच्या निधनाने दुःखात असलेल्या मुलावर वडिलही गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला. आईच्या आकस्मिक निधनानंतर रक्षाविसर्जन करून घरी परतल्यानंतर वडिलांचेही निधन झाल्याने त्यांनाही त्याच दिवशी निरोप देण्याची दुर्दैवी वेळ कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहतीमध्ये राहणारे देशपांडे कुटुंबावर आली.
कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहतीमधील काशिद कॉलनी येथे देशपांडे कुटुंब वास्तव्यास आहे. तर सदानंद देशपांडे (वय ८४) असून ते एका कंपनीतून अधिकारी पदावरून निवृत्त झाले होते. रविवारी २ जुलैला त्यांची पत्नी सुरेखा (वय ७७) यांचे आकस्मिक निधन झाले. तर त्यांचे रक्षाविसर्जन मंगळवारी ४ जुलै रोजी सकाळी करण्यात आले.

यावेळी रक्षाविसर्जनासाठी घरी मित्रमंडळींसह नातेवाईकसुद्धा आले होते. सुरेखा देशपांडे याचं निधन झाल्याने त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर असतानाच त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता सदानंद देशपांडे (वय ८४) यांचेही आकस्मिक निधन झाले. त्यामुळे आईचे रक्षाविसर्जन करून नदीवरून परतलेल्या त्यांच्या मुलांना त्याच दिवशी वडिलांनासुद्धा अखेरचा निरोप देण्याची वेळ आली. मुलगा समीर देशपांडे आणि सारस्वत बँकेतील राजारामपुरी शाखेतील वरिष्ठ शाखाधिकारी शिशिर देशपांडे यांचे ते आई – वडील होते. या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.