काय घडलं?
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मूळ गावी असलेल्या वडिलोपार्जित जमिनीचे सातबाराप्रमाणे चंद्रशेखर अन्वीकर यांनी जमिनीची मोजणी केलेली होती. त्यानुसार मोजणीच्या हद्दखुणा मोजणी नक्कल तक्रादार यांना उपलब्ध करून देण्यासाठी अन्वीकर याने १५ हजार रुपये लाचेची मागणी केलेली होती. तक्रारदाराकडून त्याने पूर्वीच पाच हजार रुपयेही घेतलेले आहेत. या प्रकरणात उर्वरित दहा हजारापैकी तडजोड करून त्याने साडेनऊ हजाराची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सिल्लोड येथील उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाहेर अजिंठा मार्गावर परशुराम चौकात साडेनऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.
या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, अशोक नागरगोजे, रवींद्र काळे, दत्तात्रय होरकटे, चंद्रकांत शिंदे यांनी केली.