• Sat. Sep 21st, 2024
घरची परिस्थिती हालाकीची, जिद्द अन् चिकाटी उराशी; टेम्पो चालकाचा मुलगा झाला CA

नाशिक : स्वप्न उराशी बाळगले की ते पूर्ण करण्यासाठी लागते ती फक्त जिद्द आणि चिकाटी हे दोन गुणधर्म आपल्याजवळ असले की आपण कितीही प्रतिकूल परिस्थितीत असलो तरी आपल्याला या परिस्थितीशी सामना करून आपल्या स्वप्नांना पर्यंत पोहोचता येते. याचे उदाहरण समाजात अनेक आहेत. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील पाथर्डी फाटा येथील रहिवासी विकी सूर्यकांत पवार हा तरुण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून चार्टर्ड अकाउंटंट झाला आहे.

विकी पवार हा तरुण ICAI मार्फत घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले. विकी याचे वडील सूर्यकांत पवार हे टेम्पो चालक असून आई गृहिणी आहे. घरची हातावरची परिस्थिती असल्याने विकी याने शिक्षणासोबतच फावल्या वेळात नोकरी करत कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. नोकरी करत असतानाच परिस्थितीची जाणीव डोळ्यासमोर ठेवत स्वप्न उराशी बाळगून अवघड समजल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं.

शरद पवारांना आणखी एक धक्का, माजी मंत्री आणि विश्वासू आमदार गेला अजित पवारांच्या गटात
विकी पवार यांनी निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी, या गुणधर्मांसोबतच सातत्य आणि संयम देखील महत्त्वाचं ठरलं आहे. स्वतःला मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर ठेवत काही काळ काम आणि अभ्यास यात गुंतवणूक घेत हे यश त्याने मिळवलं आहे. विकीच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्याने आपल्या यशाचे श्रेय त्याने आई वडील, मोठा भाऊ मंगेश पवार, संपूर्ण पवार कुटुंबीयांना दिले. तसेच सीए सतिश बर्वे व नवीन नाशिक, पवन नगर येथील कॉमर्स अकॅडमी क्लासचे संचालक रफिक इनामदार व समाधान ठोके यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील बडा नेता शरद पवारांच्या संपर्कात, अमोल कोल्हेंचा दावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed