• Mon. Nov 25th, 2024
    टेरेसवर पक्षांना धान्य टाकायला गेला अन् अनर्थ घडला; चौथ्या मजल्यावरुन कोसळून मुलाचा मृत्यू

    पुणे : पुण्यातील मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील एका सोसायटीत एका १३ वर्षीय मुलाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सकाळच्या वेळी चिमण्या पाहण्यासाठी गेला होता. मात्र, पावसामुळे निसरड्या जागेवरून त्याचा पाय घसरला आणि तो चौथ्या मजल्यावरून खाली पडला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.

    अभिनव जगदीश कडधाने (वय १३) असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो वडगाव मावळ येथील संभाजीनगर भागातील कृष्णा पार्क सोसायटीमध्ये राहायला होता. त्याच्या झालेल्या अचानक मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    सामनाच्या कार्यालयात ठाकरेंचे शिलेदार भेटले, बोलणं आटोपताच एक मातोश्रीवर, अन् दुसऱ्याने तातडीने शिवतीर्थ गाठलं
    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अभिनव बुधवारी सकाळच्या सुमारास चिमण्या पाहण्यासाठी आणि त्यांना धान्य टाकण्यासाठी घराच्या घौथ्या मजल्यावर म्हणजे गच्चीवर गेला होता. मात्र, पाऊस झाल्याने स्टाईलचा काही भाग निसरडा झाला होता. अभिनव चिमण्या पाहत असताना त्याचा पाय अचानक घसरला आणि त्याचा तोल जाऊन तो चौथ्या मजल्यावरून खाली पडला. ही कुटुंबाला कळताच त्याला घरच्यांनी तात्काळ दवाखान्यात दाखल केले, पण त्यातच त्याचा मृत्यू झाला.

    अभिनव हा घरात सर्वांचा लाडका होता. याशिवाय तो वडगाव मावळ परिसरातील रमेशकुमार सहानी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होता. शाळेमध्ये देखील अभिनव मित्रांचा लाडका होता. सर्वांशी मिळून मिसळून राहणे त्याला आवडत होते. मात्र, अचानक घडलेल्या घटनेनं कुटुंबावर आणि त्याच्या मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनव गेल्याने परिसरातील सर्व नागरिकांनी या घटनेनं हळहळ व्यक्त केली आहे.

    राऊतांच्या भेटीला पानसे, ठाकरेंना साथ देणार मनसे? दोघांचा सोबत प्रवास, नेहमीचा रस्ता टाळला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed